दारूडया पतीने केला पत्नीचा गळा आवळुन खुन लोणार तालुकयातील हिरडव येथील घटना; लोणार तालुक्यात खुनाचे सुत्र सुरूच
दिनेश मुडे
9763125072
बुलढाणा, (०४ सप्टेंबर)
जिल्ह्यातील लोणार तालुकयातील खुरमपुर येथील दारूडया नातवाने आजीचा खुन केल्याची घटना ३
सष्टेबर रोजी उघडकीस आली. त्या वृत्ताची शाई वाळत नाही तोच ३ सप्टेबरच्या संध्याकाळी हिरडव येथील दारूडया पतीने आपल्या पत्नीचा स्वत:च्या
शेतात साडीने गळा आवळुन खुन केल्याची घटना उघडकीस आली आहे. सदर
आरोपी हा खुन करून फरार झाला आहे. एकाच दिवशी दोन खुनाच्या घडल्याने
परिसरात खळबळ उडाली आहे.
हिरडव येथील विकास शेषराव घायाळ वय ३५ वर्षे याने त्याची पत्नी मृतक
लक्ष्मी विकास घायाळ वय ३४ वर्षे हिला तिच्या माहेरी बारेखेडी ता. मेहकर
येथुन हिरडव येथील शेतात पाहाणी करण्याच्या बहाण्याने आणले.
त्या वेळी सोबत त्याचा एक मुलगा व एक मुलगी होते. हिरडव येथील घरी दोन्ही
मुंलाना सोडुन ३ सष्टेबरच्या दुपारी ३ वाजेच्या दरम्यान दोघे पती-पत्नी
शेतात पाहणी करण्यासाठी गेले. दरम्यान दारूडा पती विकास याने पत्नी लक्ष्मी हिचा
तिच्या साडीने गळा आवळुन खुन करून फरार झाला. हि घटना रात्री ९ वाजेच्या
दरम्यान उघडकीस आली. हा खून नेमका कशासाठी करण्यात आला याची अधिक माहिती मिळू शकली नसून यासंदर्भात विविध चर्चा सुरू आहे.
दरम्यान हिरडव येथील पोलीस पाटील रूपाली घायाळ यांनी तात्काळ
ही माहीती लोणार पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख
यांना दिली. या घटनेची माहिती मिळताच त्यांनी पोलीस उपनिरीक्षक अजहर शेख,
हिरडव बिट जमादार गुलाबराव झोटे, पोहेका सुरेश काळे, पोका कृष्णा निकम,
सुनिल केसरकर, भागवत खाडे, गोपनिय विभागाचे कैलास चतरकर, विठ्ठल चव्हाण,
चालक जगदीश सानप, लेखनिस चंद्रशेखर मुरडकर यांनी घटनास्थळी धाव घेत
सुक्ष्म निरीक्षण करत पंचनामा केला. सदर मृतकाचे प्रेत शवविच्छेदनासाठी
ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. मृतक महीलेचा भाउ संतोष भास्कर शहाणे रा.
बोराखेडी ता. मेहकर यांनी तक्रार दिली. यावरून पोलीसांनी कलम ३०२ नुसार
पतीविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल केला. तर या घटनेचा पुढील तपास जिल्हा
पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुंजबळ, उपविभागीय पोलीस अधिकारी दिलदार
तडवी यांच्या मागदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख,
पोहेका गुलाबराव झोटे, लेखनिस चंद्रशेखर मुरडकर, सुनील केसरकर करती असुन
एकाच दिवसात दोन खुनाच्या घटना घडल्याने लोणार पोलीसांवर प्रंचड ताण
आल्याचे दिसत असुन फरार आरोपीला लवकरात लवकर गजाआड करण्यात येईल, अशी
माहीती वरिष्ठ अधिकारी रविंद्र देशमुख यांनी दिली आहे.