अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणात पाचव्या आरोपीला राजस्थान मधून अटक…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणात पाचव्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखने मोहम्मद चौधरी नावाच्या आरोपीला राजस्थानवरुन अटक केली आहे.
गोळीबार करणाऱ्यांना लॉजिस्टिक्स मदत केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. गुन्हे शाखेचे पथक आरोपीला घेऊन मुंबईत आले आहेत.
मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने सांगितले की, आरोपी मोहम्मद चौधरीने सागर पाल आणि विक्की गुप्ता या दोघांनाही पैसे पुरवण्यात आणि रेकी करण्यात मदत केली. मोहम्मद चौधरी यांना आज म्हणजेच मंगळवारी मुंबईत आणण्यात आले असून, त्यांना न्यायालयात हजर केले जाणार असून, कोठडीची मागणी करण्यात येणार आहे.
14 एप्रिल रोजी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकीस्वारांनी सलमान खानच्या घराच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबार केला. त्यानंतर दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली होती.