धरणाच्या वक्तव्याने माझं वाटोळ झालं ; अजित पवारांनी भरसभेत पकडले कान..…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
बारामती :- बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासाठी सभा घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार रिंगणात आहेत.
बारामतीची निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. अजित पवार यांनी आजच्या सभेत बोलताना आपल्याला सहज बोलून गेलेल्या विधानांमुळे कसा फटका बसला हे सांगितलं. शिर्सुफळ इथं आयोजित सभेत ते बोलत होते.
कार्यकर्ते आता माझ्या सभेला आलेत, मला दिसण्यासाठी पुढे पुढे करतील आणि मी गेलो की दुसऱ्यांच्या सभेला जातील. कुंकु लावायचं असेल तर एकाचं लावा. माझं तरी लावा नाहीतर त्यांचं तरी लावा. हा काय चाटाळपणा लावलाय. हे लपून रहात नाही असं म्हणत अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना इशारा दिला.
अजित पवार यांनी त्यांच्या धरणाबद्दलच्या वादग्रस्त विधानाचाही उल्लेख केला. अजित पवार म्हणाले की, काही झाकून राहत नाही. मी निंबोरीत असंच बोललो. घोंगडी बैठक होती. तिथं आपल्या भाषेत बोलायला गेलो. काय आता तिथं काय करावं का, धरणात. पण माझं वाटोळं झालं, परत कानाला खडाच लावला. सारखं मेंदुला सांगत असतो नीट बोलायचं, नीट बोलायचं. शब्द कुठला चुकीचा जाऊ द्यायचा नाही द्यायचा नाही,
माणूस चुकतो, जो काम करतो तो चुकतो, मी बोलतो म्हणून एखादा शब्द गेला, परंतु कायम गेला नाही.
आताच्या निवडणुकीत साहेब नाहीत आणि मी पण नाही त्यामुळे ४० वर्षापूर्वी बारामतीच्या घरात आलेल्या सुनेला द्यायचं की मुलीला द्यायचं हे बघा. सुनेला मान असतो, तर सासू थोडे दिवसांनी तिच्याच हातात चाव्या देतात, चुकलं तर सुनेला सांगते. आईच्या पोटातून कुणीच शिकून येत नाही. रस्ते माहिती नव्हते, पण केलं ना. आज भावनिक होऊ नका असंही अजित पवार म्हणाले.