लोकसभेवेळी नक्षलवाद्यांसोबत चकमक…! ; 18 माओवादी ठार ; जप्त शस्त्र पाहून जवान झाले “शॉक”
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
कांकेर :- ऐन लोकसभा निवडणुकीत छत्तीसगढ राज्यात मोठी घडामोड घडली आहे. छत्तीसगडमधील कांकेरमध्ये नक्षलवाद्यांसोबत मोठी चकमक झाली. सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत 18 माओवादी ठार झाल्याची बातमी आहे.
या चकमकीत दोन जवानही जखमी झाले आहेत. या भागात सध्या जवानांकडून सर्चिंद ऑपरेशन सुरू आहे. त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिरिक्त फौजफाटाही घटनास्थळी दाखल झाला आहे. याठिकाणी एके-47 सह मोठ्या प्रमाणात स्वयंचलित शस्त्रे जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, नक्षलवादावरही राजकारण सुरू झाले आहे. छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनी काँग्रेसचे माजी गृहमंत्री आणि महासमुंद लोकसभा उमेदवार ताम्रध्वज साहू यांच्यावर नक्षलवादावरुन निशाणा साधला आहे.
ते म्हणाले की, पाच वर्षे गृहमंत्री असताना साहू यांनी नक्षलवादाच्या विरोधात काहीही केले नाही. नक्षलवादाच्या विरोधात कोणतीही मोठी पावले उचलली गेली नाहीत. आज भाजप सरकार नक्षलवाद संपवण्यासाठी सतत काम करत आहे.