लोकसभा निवडणूक लढणार का…? अमित ठाकरेंनी एका वाक्यात विषय संपवला ; राज साहेबांनी आदेश दिले तर….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यानंतर आणखी एक ठाकरे निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे. मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी राज साहेबांनी जबाबदारी दिली तर लोकसभाही लढू असं वक्तव्य केलं आहे.
त्यामुळे ठाकरे कुटुंबातील आणखी एक व्यक्ती निवडणूक लढवू शकतो. पुणे शहरातील विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांसाठी मनसेचे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली सेनापती बापट रोड ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असा मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये शहरातील विविध भागांतील विद्यार्थी आणि मनसैनिक हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी विद्यापीठ प्रशासनाला आठ दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे.
काय म्हणाले अमित ठाकरे?
मनसे नेते अमित ठाकरे म्हणाले की या आंदोलनाचा मूळ उद्देश मला प्रत्येक विद्यापीठात मनविसेचे युनिट हवे आहे. विद्यापीठाच्या स्थापनेपासुन आपण मेसमध्ये जेवण चांगले मिळत नाही, यासाठी भांडतोय. ही शोकांतिका आहे. काल पोह्यात झुरळ मिळाले. त्याचा फोटो ठाकरे यांनी दाखवला. वॉशरुम आणि होस्टेलचे फोटो दाखवले. विशाखा समितीचा मुद्दा मांडला. पुणे विद्यापीठाचे उपकेंद्र नाशिक आणि नगर येथे आहे. तेथील नवीन इमारती तयार आहेत. पण मंत्र्यांना वेळ मिळत नसावा म्हणुन उद्घाटन होत नसल्याची टीका अमित ठाकरेंनी केली.
माझ्यावर पहिली राजकीय केस.. : अमित ठाकरेंचा अल्टीमेटम
पुण्यात ड्रग्ज मोठ्या प्रमाणात पकडले गेले आहे. हा खुप गंभीर मुद्दा आहे. चार हजार कोटींचे ड्रग्ज पकडले आहे. आम्ही मनसेच्या वतीने जनजागृती मोहीम सुरू करणार आहोत. मी राजकारणात आल्यापासुन पहिल्या राजकीय केसची वाट पहातोय. ती संधी पुणे विद्यापीठाने देऊ नये. मी त्यांना 8 दिवसांचा वेळ दिला आहे. त्या वेळेत त्यांनी कारवाई केली नाही. तर आम्ही आमच्या स्टाईलने आंदोलन करू, असा इशारा अमित ठाकरेंनी दिला.
अमित ठाकरे लोकसभा लढवणार का?
एका शहरात एव्हढे ड्रग्ज सापडले आहेत तर, त्याला गृहमंत्री जबाबदार आहेत. राज साहेब यांनी जबाबदारी दिली तर मी ते म्हणतील ती जबाबदारी मी घ्यायला तयार आहे. ते म्हटले तर लोकसभा लढवेल, विधानसभा लढवेल, नगरसेवक पण होईल. सरपंच ही होईल. पुण्यातुन ही लोकसभा लढवेल. पण माझी निवडणुक लढवण्याची इच्छा नाही, असंही अमित ठाकरे म्हणाले.