अमित शाहा यांची १५ फेब्रुवारीला औरंगाबादमध्ये सभा, महायुतीचा उमेदवार स्पष्ट होणार…?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
औरंगाबाद :- देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची पंधरा फेब्रुवारी रोजी शहरात सभा होत आहे. अमित शहा शहरात येत असल्यामुळे आणि त्यांची सभा होणार असल्यामुळे लोकसभा निवडणुकीत औरंगाबादची जागा भारतीय जनता पार्टी आणि घटक पक्ष लढणार आहेत हे जवळपास स्पष्ट दिसत आहे, त्यातच ही जागा भाजप लढणार हे स्पष्ट झाले आहे.
मागील काही दिवसांपासून औरंगाबादची जागा कोण लढणार यावरून शिंदे गट आणि भाजप यांच्यात राजकीय अपेक्षांचे वारे वाहत आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांना देखील या जागेच्या उमेदवारी वाटाघाटीत मिळेल, अशी अपेक्षा आहे.
गेल्या वर्षी अमित शहा यांची कलाग्राम समोरील मैदानात सभा नियोजित करण्यात आली होती. मराठवाडा मुक्ती संग्राम लढयाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त त्या सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. शहा यांचा दौरा देखील आला होता, परंतु हैदराबाद येथील कार्यक्रमामुळे सभा ऐनवेळी रद्द झाली. आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शहा शहरात येत असून यानिमित्त भाजप आणि संघटना पूर्ण ताकतीने कामाला लागली आहे.