राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची गाढवावर बसवून निषेध रॅली…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल अपशब्द बोलणाऱ्या राहुल गांधीचा भाजप युवा मोर्चा कडून जाहीर निषेध नोंदविण्यात आला.
राहुल गांधीच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची गाढवावर बसवून निषेध रॅली काढण्यात आली. भाजपा युवा मोर्चा व भाजपचे पदाधिकारी महात्मा गांधी चौकामध्ये आज दुपारी बारा वाजता मोठ्या प्रमाणात जमले होते. यावेळी राहुल गांधीच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारण्यात आले आणि त्यानंतर पुतळ्याचे दहन करण्यात आले.
भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ॲड आदित्य माने, भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शेखर वानखेडे, यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आलेल्या राहुल गांधीचा निषेधाच्या नोंदविण्यासाठी महिला मोर्चाच्या डॉ आरतीताई फुपाटे, रूपालीताई जयस्वाल, पाटील, निखिल चिद्दरवार, सुरेश तिवारी, डॉक्टर संदीप देशमुख, महेश काळे, राजेंद्र महाजन, अक्षय बोंबीलवार, भारत पाटील, रमेश सोमानी, सुमित ठाकूर, प्रवेश टाकरस, ऋषी काळे, सचिन आडे, गोविंद वरणे, ओंकार पाटील, संजोग तगडपल्लेवार, शिवराज पाटील, अभय काळे, नितीन टाकरस, समीर शेख, शुभम मुळे, सनी रविदासनी, यांच्यासह असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.