मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्याविषयी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मिथुन चक्रवर्ती यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या छातीत दुखू लागल्यानं त्यांना कोलकत्ता येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
सुरूवातीला त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्या उपचार सुरू आहेत. नुकताच त्यांना पद्धभूषण पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.
मिथुन चक्रवर्ती यांच्या जवळच्या नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, घरी असताना बराच वेळ त्यांना अस्वस्थ वाटत होतं. त्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांना ब्रेन स्ट्रोक आला होता. त्यानंतर आता त्यांना न्यूरो सर्जकडे रेफर करण्यात येणार आहे. मिथुन चक्रवर्ती यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळताच त्यांच्या चाहत्यांनी काळजी व्यक्त केली आहे. मिथुन चक्रवर्ती यांच्या प्रकृती सुधारावी यासाठी प्रार्थना करण्यात आली आहे. मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मिथुन चक्रवर्ती हे 73 वर्षांचे आहेत. या वयातही ते इंडस्ट्रीत अँक्टिव्ह असतात. नोव्हेंबर 2023मध्ये ते सारेगमप या रिअलिटी शोमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले होते. तेव्हा त्यांचा मुलगा नमाशी चक्रवर्ती यानं त्यांच्यासाठी एक खास व्हिडीओ तयार केला होता. जो व्हिडिओ पाहून मिथुन चक्रवर्ती यांच्या डोळ्यात अश्रू आले होते. मिथुन यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता.
मिथुन चक्रवर्ती यांनी त्यांच्या संपूर्ण बॉलिवूडमधील करिअरमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. अभिनयाबरोबरच दमदार डान्स करणारा अभिनेता म्हणून त्यांची ओळख आहे. डिस्को डान्सर अशी त्यांची एक वेगळी ओळख इंडस्ट्रीत आहे. त्यांच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये त्यांनी 350 हून अधिक सिनेमांमध्ये काम केलं आहे.