उद्योजकांना विविध उद्योग उभारण्यासाठी अर्थसहाय्य देण्यासंबंधी एक दिवसीय जनजागृती शिबीराचे आयोजन ; महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचा उपक्रम…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- महिला, युवक युवती, सुशिक्षीत बेरोजगार, आदिवासी, जेष्ठ नागरीक, अनुसुचित जाती जमाती, इतर मागास वर्ग, भटक्या विमुक्त जमाती, स्वातंत्र्य सैनिक, स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट, स्वयंसहाय्यत युवा गट, शेतकरी, शेतमजूर, भूमिहिन, पारंपारिक कारागीर इत्यादी समाजातील सर्वच घटकांना शासनाच्या योजनांचा लाभ देण्याच्या दृष्टीने जनजागृती एकदिवशीय प्रशिक्षण शिबिराचे पुसद येथे आयोजन
महाराष्ट्र शासन, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय मुंबई-३२ यांचा शासन मर्णय क केव्हीबी-२०१७/प्र.के. उद्योग ६ दि.१८ जुन २०१९ अन्वये महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मद्य केंद्र योजना (मधमाशापालन) संपूर्ण राज्यात कार्यान्वीत झालेली आहे, या योजने अंतर्गत महिला, युवक युवती, सुशिक्षीत बेरोजगार, आदिवासी, जेष्ठ नागरीक, अनुसुचित जाती जमाती, इतर मागास वर्ग, भटक्या विमुक्त जमाती, स्वातंत्र्य सैनिक, स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट, स्वयंसहाय्यत युवा गट, शेतकरी, शेतमजूर, भूमिहिन, पारंपारिक कारागीर इत्यादी समाजातील सर्वच घटकांना मध योजनेचा लाभ देण्यात येतो. याशिवाय महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना, इत्यादी योजना राबविण्यात येतात. सदर योजने अंतर्गत उद्योजकांना विविध उद्योग उभारण्यासाठी अर्थसहाय्य देण्यात येते तसेच अनुदानाचा लाभ देण्यात येतो. मध योजनेअंतर्गत लाभ घेवू इच्छिणा-या व्यक्तींना विनाशुल्क निवासी प्रशिक्षण देण्याची व्यवस्था मंडळामार्फत करण्यात येते.
वरील योजनांची माहिती व फायदे जास्तीत जास्त लोकांना व्हावी यासाठी मंडळाची योजनांची माहिती देण्यासाठी दिनांक ०७/०२/२०२४ रोजी एक दिवसीय जनजागृती शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मेळाव्यामध्ये शासनाचे कृषि विभाग, वन विभाग, पंचायत समिती, इत्यादी शासकीय कार्यालयाचा सहभाग सुद्धा राहणार आहे. मेळाव्याचे ठिकाण नगरपरिषद हिंदी शाळेच्या बाजूच्या बगीच्या मधील हॉल, क्रांतिवीर बिररसा मुंडा चौक, पुसद जि. यवतमाळ येथे असून वेळ सकाळी ११ ते सायंकाळी ५ पर्यंत राहील. सदर मेळाव्यात प्रवेश निःशुल्क राहील. इच्छुकांची नांव नोंदणी करून त्यांचे फॉर्म भरून घेण्यात येतील.
तरी सदर शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे जिल्हा ग्रामोधोग अधिकारी यवतमाळ यांचे मार्फत करण्यात येत आहे.
बिरसा मुंडा ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष मारोती भस्मे
नवीन उद्योग उभारण्यासोबतच आपला उद्योग वाढीसाठी आधार देऊन योग्य त्या उपाययोजना करून बेरोजगारांना, शेतकऱ्यांना, युवकाना स्वाभिमानाने जीवन जगण्यासाठी शासनाच्या काय उपाय योजना आहे आणि त्या प्रत्यक्ष पणे कशाला राबवता येईल या दृष्टीने जनजागृती कार्यक्रमाचे आवडले आयोजन करण्यात आले आहे या संधीचा आदिवासी बहुल पुसद तालुक्यातील सर्वच नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन बिरसा मुंडा ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष मारोती भस्मे यांनी केले आहे.