कुंभकर्णी झोपेतील प्रशासनाला जागविण्यासाठी ताला ठोको आंदोलन ; तृतीयपंथीयांच्या उपस्थितीने हादरले नगर प्रशासन ; महाविकास आघाडीचा साखळी उपोषणाचा नववा दिवस…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- गोरगरिबांच्या न्याय हक्कासाठी चालू असलेल्या साखळी उपोषणाची दखल न घेणाऱ्या मुख्याधिकारी अभिजीत वायकोस यांचा तृतीय पंथीयांनी चांगलाच खरफुस समाचार घेतला. आणि सध्या समाज माध्यमांवर तोच व्हिडिओ चांगलाच व्हायरल होऊन चर्चिल्या जात आहे. आता तरी प्रशासनाला जाग येणार का? असा प्रश्नसध्यातरी अनुत्तरीत आहे. आणि आता नगरपालिकेवर ताला ठोको ची नामुष्की येणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गोरगरिबांना घरकुलाचा लाभ मिळवून देण्यासाठी अनेक वर्षापासून नमुना ड न देणाऱ्या नगर प्रशासनाला व लोकप्रतिनिधीला जागृत करण्यासाठी मागील नऊ दिवसापासून उपोषण चालू आहे. प्रशासन दखल घेत नाही त्यामुळे या कुंभकर्णी प्रशासनाची झोप उडविण्यासाठी, गोरगरिबांना न्याय मिळवून देणाऱ्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाऱ्या या प्रशासनाला जागृत करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने नगरपालिकेला एक फेब्रुवारी ला ताला ठोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
पुसद नगरपरिषद कार्यालयासमोर १६ जानेवारी २०२४ पासून शहरातील प्रलंबित असलेले नमुना ड नागरिकांना त्वरित देण्यात यावे. तसेच २०१८ मध्ये शासनाकडून ३०० घरकुल मंजूर झाली त्याची रखडलेले अनुदान निधी ताबडतोब देण्यात यावे. शहरातील बेघर असलेल्या वंचित कुटुंबीयांना शासनाचे नियमानुसार प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ देण्याच्या मागणीला धरून १६ जानेवारी २०२४ पासून महाविकास आघाडीच्या वतीने उपोषण सुरू आहे. उपोषणाला नऊ दिवस पूर्ण होत असताना सुद्धा प्रशासनाकडून आणि लोकप्रतिनिधीकडून कोणतीही दखल घेतल्या गेली नाही. त्यामुळे संतप्त उपोषणकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या वतीने कुंभकर्णी झोपेतील प्रशासनाला व लोकप्रतिनिधीला जागृत करण्याचा निर्धार केला आहे. ३१ जानेवारी २०२४ पर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास एक फेब्रुवारी २०२४ पासून पुसद नगरपरिषदेला साखळी उपोषणा सोबतच टाला ठोको आंदोलन करणार असल्याचा इशारा देणारे पत्र दिले आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना गटाचे शहर प्रमुख संतोष दरणे, शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुसद शहर अध्यक्ष साकिब शाह जानुल्ला शाह, वंचित बहुजन आघाडीचे पुसद शहराध्यक्ष जयानंद उबाळे, यांच्या सहीनिशी नगरपरिषद पुसद, जिल्हाधिकारी यवतमाळ, उपविभागीय अधिकारी पुसद, महासंचालक नगर रचना महाराष्ट्र राज्य पुणे, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण मुंबई, उपाधीक्षक भूमि अभिलेख कार्यालय पुसद, यांना इशारा देणारे निवेदन २४ जानेवारी २०२४ रोजी दिले आहे.
सदर निवेदन देतेवेळी बुद्धरत्न भालेराव, सय्यद इस्तियाक, विजय बाबर, साकिब शाह,
जयानंद उबाळे डॉक्टर अरुण राऊत, अर्जुन राठोड, रवी बहादुरे, दिनेश गवळी, हरीश गुरुवाणी, निवृत्ती थोरात, मधुकर सोनुणे, सलीम भाई, मुनाफ खतीब, खिल्लारे यांच्यासह तृतीयपंथी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.