राष्ट्रवादीच्या सुनावणीला मोठे वळण, बंद कपाटात ठेवलेली ‘ती’ कागदपत्रे गायब…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- शरद पवार गटातील जितेंद्र आव्हाड यांनी सुनावणीवेळी गौप्यस्फोट करत कागदपत्रे गहाळ असल्याची बाब समोर मांडली आहे. याचा मोठा परिणाम राष्ट्रवादी आमदार अपात्रता सुनावणीवर होताना दिसणार आहे.
शिवसेना (Shiv Sena) पक्षाप्रमाणेच राष्ट्रवादी पक्षाची देखील आमदार अपात्रतेची सुनावणी (NCP MLA Disqualification) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांच्यापुढे पार पडत आहे. आज राष्ट्रवादी पक्षातील आमदार अपात्रता सुनावणीचा पहिलाच दिवस असताना राष्ट्रवादी पक्षाबाबत (NCP) मोठी बातमी समोर येत आहे. शरद पवार (Sharad Pawar) गटातील जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी सुनावणीवेळी गौप्यस्फोट करत कागदपत्रे गहाळ असल्याची बाब समोर मांडली आहे. याचा मोठा परिणाम राष्ट्रवादी आमदार अपात्रता सुनावणीवर होताना दिसणार आहे.
राष्ट्रवादी आमदार सुनावणीचा आज पहिलाच दिवस असताना या प्रकरणाला मोठे वळण मिळाले आहे. पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची साक्ष नोंदवण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाच्या वकिलांनी जितेंद्र आव्हाड यांची उलटसाक्ष नोंदवण्याचा प्रयत्न केला. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी पक्षाची अंतर्गत निवडणूक झाल्याचे कागदपत्र कपाटातून गायब झाल्याची धक्कादायक बाब समोर आणली आहे.
“राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाची अंतर्गत निवडणूक घेण्यात आली. या निवडणूकीनंतर यासंबंधीची सर्व कागदपत्रे बंद कपाटामध्ये ठेवण्यात आली होती. विशेष म्हणजे याची जबाबदारी देण्यात आलेल्या दोन माणसांनी ते गहाळ केले. संबंधित माणसं पक्ष सोडून गेले आहेत. त्यांनी या कागदपत्र म्हणजे पुराव्यांचा काय केलं माहिती नाही.” अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी सुनावणीवेळी गंभीर बाब समोर आणली आहे. आव्हाडांनी केलेल्या गौप्यस्फोटानंतर राष्ट्रवादी अपात्रता सुनावणी प्रकरण वेगळे वळण घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.