हाजी रफिक अहेमद लोहार नगरपरिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळा क्र. २ येथे क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम चा शुभारंभ…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- आज दिनांक 12 जानेवारी 2024 शुक्रवार रोजी नगरपरिषद पुसद अंतर्गत हाजी रफिक अहेमद लोहार नगर परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळा क्र.२ लोहार लाईन पुसद येथे क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचा उद्घाटन करण्यात आला या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी श्री हाजी अब्दुल गफ्फार कुरेशी साहब माजी नगरसेवक नगर परिषद पुसद हे होते कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी कुराणाची पठण करून केले त्यानंतर विद्यार्थ्यांनी सामूहिक नात पठण केले शाळे चे मुख्याध्यापक श्री मोहम्मद शारिक सर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष यांच्या पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
आलेले प्रमुख पाहुणे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री फारुक अहेमद तेली व वकील भाई गौरी यांच्या स्वागत शाळेतील ज्येष्ठ शिक्षक मोहम्मद मुजम्मिल सर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व फारुक अहेमद कुरेशी यांच्या स्वागत श्री मोहम्मद शारिक सर मुख्याध्यापक यांनी केले तसेच कार्यक्रमात वार्डातील नागरिक व पालक बहुसंख्यांनी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मोहम्मद मुजम्मिल सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती वहिदा रहेमान बाजी यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता शाळेतील सर्व शिक्षक व बालवाडी मदतनीस मुस्कान सदफ अत्ताऊल्ला खान यांनी मोलाचे कार्य केले