धनादेश अनादर प्रकरणी शिक्षा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- टेकचंद अवधुत काठोळे रा. खाकरे ले आउट पुसद ता. पुसद जि.यवतमाळ यांचे कडुन शेख रहिम शेख सत्तार यांनी मंडप डेकोरेशन चे सामान खरेदी करण्या करीता रू.३,५०,०००/- उसनवार म्हणुन घेतले होते व या रक्कमेची मागणी त्यांना केली असता त्यांनी या रक्कमेचे परतफेडी करीता स्टेट ट्रॉन्सपोर्ट को ऑपरेटिव्ह बॅन्क पुसद चा धनादेश दिला व धनादेश वटविण्या करीता टाकला असता अनादरीत झाल्यामुळे त्याच्याविरूध्द निगोशिएबल इंन्स्ट्रमेंटस् अॅक्टचे कलम १३८ अनुसार पुसद येथील वि. पहिले न्याय दंडाधिकारी प्र.श्रे.श्रीमान व्यास साहेब यांचे न्यायालयात फिर्याद दाखल केली सदर प्रकरणात शेख रहिम शेख सत्तार यानां दोषी उरवुन त्यामध्ये सहा महिणे साधा कारावास व रू.३,५०,०००/- नुकसान भरपाई व सदर नुकसान भरपाईची रक्कम न भरल्यास सहा महिणे साधी कैद आदेशित केले आहे. सदर प्रकरणात फिर्यादी तर्फे सक्ष्म व प्रखरतेने बाजु मांडुन युक्तीवाद अॅड.सी.एस. शामसुंदर यांनी केला.