खळबळजनक…! महाराष्ट्रात ठिकठिकाणी बॉम्ब स्फोट घडवण्याची धमकी, नागपुर पोलिसांना मिळाला ईमेल….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- राज्यात ठिकठिकाणी बाँबस्फोट घडविणार असल्याच्या धमकीचा ईमेल नागपूर पोलिसांना दोन दिवसांपूर्वी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. यानंतर रामन सायन्स येथे पोलिसांनी शुक्रवारी सर्च मोहीम राबवली.
देशात २२ जानेवारीला अयोध्येत श्रीरामललाची प्रतिष्ठापना केली जात आहे. त्यानिमित्ताने सर्वत्र दिवाळी साजरी करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्याने ठिकठिकाणी कार्यक्रमांचेही आयोजन केले आहे.
मात्र, अशावेळी देशात अशांतता निर्माण करण्याच्या उद्देशाने काही संघटनांकडून प्रयत्न होत असल्याचे संकेत केंदीय तपास यंत्रणेला मिळाले आहे. याच आशयातून नागपूर पोलिसांना असा एक इमेल दोन दिवसांपूर्वी मिळाला. त्यात नागपुरातील रमन विज्ञान केंद्र उडवून देण्याची धमकी देण्यात आली.
दरम्यान गणेशपेठ पोलिसांनी रामन विज्ञान केंद्र गाठून संपूर्ण तपासणी केली. मात्र, त्यात काहीही आढळले नाही. त्यामुळे पोलिसांनी सुटकेचा श्वास सोडला. दरम्यान असेच इमेल सर्वत्र आल्याची माहिती असून मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंदविल्याचीही माहिती आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्याने दुजोरा दिला असून संपूर्ण प्रकरणात गुप्तता पाळण्यात आल्याचे समजते.