शिंदेंनी बोलावली सर्वपक्षीय नेत्यांची बैठक, ठाकरेंच्या एकाच आमदाराला निमंत्रण…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसलं आहे. या आंदोलनाला कालपासून काही ठिकाणी हिंसक वळण लागलं. संतप्त मराठा आंदोलकांनी आता आमदारांची निवासस्थाने, कार्यालये आणि व्यवसायांना लक्ष्य केले आहे.
दुसरीकडे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. त्यामुळे आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता आहे. अशात आता सरकारवर दवाब वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईत हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्या सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलवली आहे. मात्र, यामध्ये ठाकरे गटाच्या एकाच आमदाराला निमंत्रण दिल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
उद्याच्या सर्व पक्षीय बैठकीसाठी सर्व पक्षातील नेत्यांना निमंत्रण देण्यात आली आहेत. मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या सर्व पक्षीय बैठकिस ठाकरे गटाच्या एकाच आमदाराला निमंत्रण देण्यात आले आहे. काँग्रेसचे 3 तर राष्ट्रवादीच्या 4 व्यक्तींना या बैठकिसाठी निमंत्रण देण्यात आले आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना बैठकीसाठी निमंत्रण आहे. मात्र ठाकरेंकडून फक्त विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांना निमंत्रण देण्यात आले आहे. तर भाजपकडून छत्रपती उदयनराजे भोसले हे उपस्थित राहणार आहेत. वंचितकडून प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे उद्याच्या बैठकीत काय निर्णय घेतला जातो, हे पाहणे महत्त्वाचे आहे.
सोमवारी उशिरापर्यंत शिंदे-फडणीवसांमध्ये चर्चा
सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर महत्त्वाची बैठक पार पडली. यामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील पोलीस अधिक्षकांकडून परिस्थितीचा आढावा घेतला गेला. राज्यात ज्या ज्या ठिकाणी उद्रेक झाला आहे, त्याच बरोबर संभाव्य ठिकाणी उद्रेक होण्याची शक्यता आहे, त्या ठिकाणी संचार बंदी व कलम 144 चा वापर करण्याबाबत चर्चा झाली. राज्यात शांतता-कायदा व सुव्यवस्था हाताबाहेर जाऊ नये यावर सरकारचा प्राथमिकरित्या भर असण्यावर चर्चा सुरू आहे. सोशल मिडियाच्या माध्यमातून आक्षेपार्ह पोस्ट व आंदोलनाबाबत आक्रमक पोस्ट केल्या जात आहे. यावर सायबर पोलिसाकडून विशेष लक्ष ठेवण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळते. विशेष अधिवेशन बोलवण्याबाबत कुठलिही चर्चा नाही.

पत्रकारावर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या ठाणेदारांवर निलंबनाची कारवाई करा ; महागाव तालुका पत्रकार संघाचा आंदोलनाचा इशारा….
राज्यात गारपिटीचा हाहाकार..! 12 जिल्ह्यांमध्ये संकट, थेट ऑरेंज अलर्ट, पुढील…
“शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करा, शेतमालाला हमीभाव द्या”: हर्षवर्धन सपकाळांची मागणी, सरकारवर टीका….
राष्ट्रवादीत काय चालले आहे..? अविश्वासाचे वातावरण आणि नेतृत्वाचा संघर्ष….
संकटाची परिस्थिती हीच संधी ; लोकांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरा….
‘५० खोके’ला ५० ‘ठोसे’ने उत्तर; शिंदेसेनेला साथ देत भाजप नेत्यांचा विरोधकांना इशारा….