सुप्रीम कोर्टाच्या दणक्यानंतर राहुल नार्वेकरांना भर दिवाळीत “ओव्हर टाइम” करावा लागणार…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणाच्या सुनावणीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने कठोर पाऊल उचलले आहे.
शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील निर्णय 31 डिसेंबरपर्यंत घ्या, असे निर्देश सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी दिले. त्यानंतर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी(Rahul Narvekar) कंबर कसली असून शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात विधीमंडळ नव्याने वेळापत्रक तयार करण्यात येत आहे. विधानसभा अध्यक्षांना वेळापत्रकासाठी ओव्हरटाईम करावा लागणार आहे. त्यामुळे ऐन दिवाळीच्या सुट्टीत सुनावणी होण्याची शक्यता आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर विधानसभा अध्यक्ष अॅक्शन मोडवर दिसत आहे. हिवाळी अधिवेशन तोंडावर आले आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनात कामकाज सुरु असताना अपात्रता सुनावणी घ्यावी लागणार आहे. एकाचवेळी अधिवेशन आणि सुनावणीचे काम अध्यक्षांना पाहावे लागणार आहे. हिवाळी अधिवेशनात अध्यक्षांची तारेवरची कसरत होण्याची शक्यता आहे.
चार ते पाच महिन्यांचा अवधी लागणार
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या अपात्रतेचा (MLA Disqualification) फैसलाही 31 जानेवारीपर्यंत द्यावा, असेही सुप्रीम कोर्टाकडून सांगण्यात आले. सरन्यायाधीशांनी विधानसभा अध्यक्षांना नवे वेळापत्रक (Scedule) सादर करण्याचे आदेशही दिले होते. मात्र, नव्या वेळापत्रकानुसारही आमदार अपात्रतेची सुनावणी पूर्ण होण्यासाठी चार ते पाच महिन्यांचा अवधी लागणार आहे. त्यामुळे हे नवे वेळापत्रकही फेटाळत आता सर्वोच्च न्यायालयाने थेट हस्तक्षेप करत कोणत्याही परिस्थितीत ही सुनावणी 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण करा, असे निर्देश दिले.
विधानपरिषद विरोधी पक्ष नेते नार्वेकरांच्या भेटीला
ठाकरे गटाचे आमदार विधानपरिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली उद्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची विधानभवनात आज दुपारी भेट घेणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणी संदर्भात ही भेट असणार आहे. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडल्यानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर ऑर्डर कॉपी आली नाही असं माध्यमांशी बोलताना वक्तव्य केलं होत. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि अध्यक्ष यांना कोर्टाची प्रत आम्ही देणार आहोत असं म्हटलं होत. त्यानंतर अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात ठाकरे गटाचे आमदार विधानभवन येथे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांना भेटणार आहेत.

पत्रकारावर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या ठाणेदारांवर निलंबनाची कारवाई करा ; महागाव तालुका पत्रकार संघाचा आंदोलनाचा इशारा….
राज्यात गारपिटीचा हाहाकार..! 12 जिल्ह्यांमध्ये संकट, थेट ऑरेंज अलर्ट, पुढील…
“शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करा, शेतमालाला हमीभाव द्या”: हर्षवर्धन सपकाळांची मागणी, सरकारवर टीका….
राष्ट्रवादीत काय चालले आहे..? अविश्वासाचे वातावरण आणि नेतृत्वाचा संघर्ष….
संकटाची परिस्थिती हीच संधी ; लोकांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरा….
‘५० खोके’ला ५० ‘ठोसे’ने उत्तर; शिंदेसेनेला साथ देत भाजप नेत्यांचा विरोधकांना इशारा….