शिवसेनेच्या लोकसभेच्या त्या १३ जागांवर कुणाचा डोळा..? मविआत राडा होण्याची शक्यता..?

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांची भेट घेतली. लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानल्या जात आहे. या बैठकीत आगामी निवडणुकांबाबत चर्चा झाल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले.
अशोक चव्हाण म्हणाले, काँग्रसमध्ये झालेल्या चर्चेची माहीती देण्यात आली. जागा वाटपाबाबत चर्चा झाली नाही. फक्त विचारांवर चर्चा झाली. सखोल चर्चा झाली नाही. अधिवेशनाच्या पूर्वतयारी बाबत चर्चा झाली. ही औपचारीक भेट होती.
शिवसेनेने ज्या जागा जिंकल्या होत्या त्या त्यांनाच मिळाव्या, असे संजय राऊत यांनी म्हटले होते. यावर अशोक चव्हाण म्हणाले, अस नाही आहे. चर्चा झाल्यानंतर हा विषय मार्गी लागू शकतो. राज्यातील राजकीय बदलली आहे. तिघांनाही समजून घ्याव लागेल.
राज्यातील राजीकीय परिस्थिती आणि मेरीट डोळ्यासमोर ठेऊन निर्णय घेण्यात येईल. ज्या ठिकाणी जागा निवडून आलेल्या होत्या. जे खासदार आहेत तिथे अडचणी येणार नाहीत. मात्र जे खासदार इतर पक्षात गेले. तेथील सध्याची राजकीय परिस्थिती काय आहे, हा प्राथमिक विषय आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घेण्यात यावा, असे चव्हाण म्हणाले.
ठाकरे गटाचे खासदार एकूण १८ खासदार होते. त्यांच्यापैकी १३ खासदार एकनाथ शिंदे यांच्या बरोबर गेले. त्यामुळे महाविकास आघाडीत या जागांसाठी गदारोळ होऊ शकतो. अशोक चव्हाण यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळाच चर्चेला उधान आलं आहे.
त्या १३ जागा कोणत्या?
दक्षिण मध्य (मुंबई), उत्तर मध्य (मुंबई), यवतमाळ, कल्याण, हातकांगले, कोल्हापूर, बुलढाणा, नाशिक, मावळ, हिंगोली, रामटेक, परभणी, शिर्डी