भारत राष्ट्र समिती पक्षासाठी राष्ट्रीय विरोधी आघाडीची दारं बंद, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा…..

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि बीआरएसचे अध्यक्ष केसीआरयांच्या भारत राष्ट्र समितीचा अन्य विरोधी पक्षांनी चांगलाच धसका घेतलेला दिसतोय. कारण 2024 च्या निवडणुकीसाठी राष्ट्रीय विरोधी आघाडीची दारं बीआरएस पक्षासाठी बंद करण्यात आली आहेत.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी तशी घोषणाच केली आहे. विशेष म्हणजे बुधवारी दिवसभर केसीआर पंढरपूर आणि तुळजापूर दौऱ्यावुर होते. सरकोलीमध्ये भगिरथ भालके यांच्या प्रवेशाचा कार्यक्रम सुरू असतानाच हा निर्णय जाहीर करण्यात आला.