शेळी पाळणाऱ्या शेतकऱ्याला शेळी पालनातून लागली लॉटरी
- एकाच वेळी एका शेळीने तब्ब्ल पाच पिलांना दिला जन्म
- गावात कुतूहलाचा विषय गावकय्रांची पिल्यालाना पाह्यला गर्दी
विदर्भ वतन न्यूज पोर्टल, गोंदिया
राधाकिसन चुटे / जिल्हा प्रतिनिधी / गोंदिया
गोंदिया :- गोंदिया सोनी गावात एका शेळी पालक शेतकऱ्याला शेळी पालनातून पाच पिलांची लॉटरी लागली आहे . एकूण जरा नवलच वाटेल मात्र हे खरे आहे पटले यांच्या एका शेळीने एकाच वेळी पाच पिलांना जन्म दिल्यामुळे गावात कुतूहलाचा विषय ठरला असून .त्याच्या शेळीला पाहण्याकरिता लोकांची गर्दी होत आहे.
सोनी गावातील अल्प भूधारक शेतकरी रेवचंद पटले मागील ५ वर्षा पासून पटले कुटूंबीय शेती परवडत नाही म्हणून, शेती सोबत जोडधंदा म्हणून शेळी पालन करतात. पटले यांनी तब्ब्ल ५ वर्षा पूर्वी एक शेळी आणि बकरा विकत घेतला त्यानून त्यांना एका वर्षात दोन पिले जन्माला आली आणि मग सुरु झाला शेळी पालन व्यवसाय. पटले हे शेतीची कामे आटोपल्यावर आपल्या शेळ्यांना स्वतः शेतात चरायला घेऊन जातात आणि वेळो वेळी त्याची काळजी देखील घेतात. सध्या त्याच्या कडे ५ शेळ्या आहेत. त्यातीलच एका शेळीने पंधरा दिवसा आधी ५ पिलांना जन्म दिला . यापूर्वी देखील अनेकदा शेळी ने पाच ते सात पिलांना जन्म दिलाच्या बातम्या आपण एकला आहात. मात्र पाच किंवा सात पिले जन्माला आल्यावर ते स्वस्थ राहत नाही. तर काही पिलांची पुरेशी वाढ होत नाही तर यातील काही पिल्ले दगावतात देखील . मात्र पटले यांची शेळी त्याला अपवाद असून त्यांनी घेतलेल्या काळजीने आज त्यांच्या शेळीची पाचही पिल्ले डॉ. च्या मते सुदृढ आहे . तर याच शेळीने या आधी चारदा पिलांना जन्म दिला तर पहिल्या वेळी २ पिले तर दुसऱ्या वेळी ३ आणि चवथ्या वेळीं
३ पिले तर पाचव्या वेळी तब्ब्ल ५ पिलांना जन्म दिल्याने पटले याची शेळी पालनात लॉटरी लागली असे म्हटले तरी वावगं ठरणार नाही. त्यामुळे कमी खर्चात आणि कमी वेळेत शेतीतून जास्त नफा मिळवायचा असेल तर शेतीला जोडधंदा म्हणून गौवू पालन केली शेळी पालना शिवाय पर्याय नाही.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….