तिसरी कोलाम परिषद रद्द
विदर्भ वतन न्यूज पोर्टल, चंद्रपूर
चंद्रपूर – महाराष्ट्र सरकारच्या आवाहनानंतर करोना विषाणू संसर्गाचा प्रभाव लक्षात घेता जिवती तालुक्यातील रायपूर खडकी येथे आयोजित करण्यात आलेली तिसरी कोलाम परिषद तातडीने रद्द करण्यात आली आहे. या परिषदेची नवी तारिख लवकरच जाहीर करण्यात येईल, असे आयोजन समितीने म्हटले आहे. येत्या १५ मार्चला या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते माणिकगड पहाडावर वास्तव्यात असलेल्या आदिम कोलामांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न म्हणून कोलाम विकास फाउंडेशन या संस्थेने हा उपक्रम सुरू केला आहे. या सोहळ्यात परिसरातील हजारो कोलाम एकत्र येऊन आपल्या समस्या मांडतात कोलामी संस्कृतीचे प्रदर्शनही यावेळी घडविले जाते. कोलाम विकास फाउंडेशनचे हा कार्यक्रम तूर्तास रद्द करून लवकरच कार्यक्रमाची पुढची तारीख निश्चित करण्यात येणार असल्याचे आयोजन समितीच्यावतीने सचिव मारोती यांनी सांगितले आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….