पुसद येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून मा. शरद भाऊ मैंद अध्यक्ष पुसद अर्बन बँक, यांची विशेष उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ शंकर दळवे, सुरज कुरील नेता मोची समाज, नारायण अप्पाराव वडस्कर, तुकाराम हाटे, पत्रकार मोहम्मद अजीम, बाबुराव पाईकराव,संतोष अंभोरे (शहर अध्यक्ष भीमशक्ती संघटना पुसद ) चंद्रकांत तगलपल्लेवार, प्रदीप पापीनवार,हे होते, सर्वप्रथम विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे कार्यक्रमाचे विशेष अतिथी शरद भाऊ मैंद अध्यक्ष पुसद अर्बन बैंक यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भीमसैनिक उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन यादव वानखेडे यांनी केले तर आभार प्रदर्शन यादव हाटे यांनी केले.