उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ; शिंदे गटाकडून पक्षनिधीवर दावा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- शिवसेना शिंदे गट आता शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का देण्याच्या तयारीमध्ये आहे. शिवसेनेच्या पक्षनिधीवर शिंदे गटाकडून दावा करण्यात आला आहे.
या प्रकरणात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. शिवसेना भवन, सर्व शाखा, सर्व बँकेतील पक्ष निधी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला देण्यात यावा अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. मुंबईतील वकील आशिष गिरी यांच्या वतीनं सुप्रीम कोर्टात ही याचिका दाखल करण्यात आली आहे. पक्षनिधीवर दावा काही दिवसांपूर्वीच निवडणूक आयोगाने पक्षाचं चिन्ह धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव शिंदे गटला दिले आहे.
त्यामुळे शिंदे गट हीच अधिकृत शिवसेना झाली आहे. मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशामध्ये पक्षनिधीबाबत कोणतीही स्पष्टता नव्हती. म्हणून मुंबईचे वकील आशिष गिरी यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेची चल -अचल संपत्ती देण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.
सुप्रीम कोर्ट या प्रकरणात आता काय निर्णय घेणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ काही दिवसांपूर्वीच निवडणूक आयोगानं धनुष्यबाण आणि शिवसेना शिंदे गटाला दिली. हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का होता. मात्र या धक्क्यातून सावरत असतानाच आता आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. शिंदे गटाकडून पक्षनिधीवर दावा करण्यात आला आहे. या प्रकरणात एक याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.