पुसद येथे सप्तशृंगी देवी मंदिरात चैत्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- येथील ईटावा वार्डातील सप्तशृंगी मंदिरात चैत्र नवरात्र उत्सव साजरा करण्यात आला या उत्सवाला रामनवमीपासून ते 7 एप्रिल पर्यंत मंदिराच्या प्रांगणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी मोठ्या भक्ती भावाने नवरात्र उत्सव पार पडला पुसद येथील कीर्तिमान कैलासवासी बाबारावजी पैलवान लेवेकर व त्यांच्या पत्नी कैलासवासी कमलबाई बाबाराव लेवेकर यांच्या भक्तीतून साकारलेले पुसद येथे सप्तशृंगी चे मंदिर होय त्याच भक्ती भावनेतून वारसा हक्काने मा. श्री रमेश चव्हाण (पाटील) व अनिल चव्हाण (पाटील) परिवारातर्फे परंपरा चालवीत आहेत पुसद ते दिग्रस रोडवर स्थित असलेल्या सप्तशृंगी ची मूर्ती अवघ्या महाराष्ट्रात आराध्य दैवत म्हणून मानली जात आहे सदर मंदिरात दरवर्षी नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात येते त्यानुसार याही वर्षी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते सतत सात दिवस होम हवन दररोज दोन्ही वेळ पूजा व आरती तसेच गुरुचरित्राचे पारायण सात दिवस करण्यात आले होते आणि शेवटच्या दिवशी म्हणजे 7 एप्रिल ला सकाळी भजन दिंड्यासह अनेक वाद्याच्या गजरात पालखीची मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीतील ध्वज निशाण व सजवलेली घोडी विशेष आकर्षण ठरले व भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडण्या सारखा देखावा मिरवणुकीतून सादर करण्यात आला या मिरवणुकीत असंख्य प्रतिष्ठित नागरिक पुरुष महिला मुले मुली सहभागी झाले होते मिरवणूक ईटावा वार्ड मधील संत हनुमंता बापू मंदिर मारुती मंदिर महाकाली मंदिर वाघामाय मंदिर जगदंबा मंदिर या मार्गावरून प्रस्थान करून सप्तशृंगी देवी मातेच्या मंदिरात देवीच्या चरणी भाविक लीन झाले या विशेष सोहळ्यात माऊली महिला भजनी मंडळ ईटावा वार्ड जगदंबा महिला भजनी मंडळ ईटावा वार्ड पिंपळगाव येथील महादेव भजनी मंडळ व निंबी येथील महिला भजनी मंडळ आणि हनुमंता बापू भजनी मंडळ यांचा सहभाग होता तसेच सकाळी 11 ते सायंकाळपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते…