राष्ट्रवादीमधून आऊटगोइंग सुरूच…! माजी मंत्र्यांची कन्या भाजपमध्ये जाणार….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणावर पक्षांतराचे प्रमाण वाढले आहे. राज्यात सत्तांतर झाल्यापासून महाविकास आघाडीतील नेत्यांचे शिंदेंच्या शिवसेनेत आणि भाजपमध्ये जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.
अशातच गेल्या काही दिवसांपासुन राजकारण ढवळुन निघालेल्या नाशिकच्या राजकारणातुन महत्वाची बातमी समोर येत असून आज माजी खासदार वसंतराव पवार यांच्या कन्या अमृता पवार या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर महाविकास आघाडीसह इतर लहान मोठ्या पक्षामधून भाजपमध्ये इनकमिंग वाढली आहे. अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
तर काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. मालेगाव मधील डॉ. अद्वय हिरे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत (ठाकरे गटात) प्रवेश केला आहे.
त्यानंतर आता नाशिक जिल्हा परिषदेत सदस्य म्हणून काम पाहिलेल्या माजी खासदार डॉ. वसंतराव पवार यांच्या कन्या अमृता पवार या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे नाशिकमधून भाजपला आणखी बळ मिळणार आहे.
शिवाय आगामी निडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने चांगलीच खेळी खेळल्याचे दिसून येत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडणार आहे.
अमृता पवार यांच्यासह काँग्रेसचे माजी मंत्री तथा माजी खासदार अनंतराव देशमुख आणि त्यांचे पुत्र नकुल देशमुख यांचा आज भाजपामध्ये प्रवेश होणार आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने हा प्रवेश महत्वाचा मानला जात आहे. एकीकडे भाजप-शिवसेनेत असलेली फूट आणि महाविकास आघाडीने केलेली एकजूट यामुळे आगामी लोकसभा निवडणूक चुरशीची होणार आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…