मोठी बातमी…! सुभाष देसाईंचे पुत्र भूषण देसाईंचा मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धक्का दिला आहे.
ठाकरे यांच्या जवळचे मानले जाणारे माजी मंत्री सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.
जून महिन्यात एकनाथ शिंदे यांच्या ४० आमदारांनी बंड केले.यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले. आता एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना धक्के देण्यास सुरुवात केली. राज्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. तर दुसरीकडे केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय दिला. यामुळे आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
आता माजी मंत्री सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंना हा मोठा धक्का मानला जात आहे. कारण सुभाष देसाई हे उद्धव ठाकरे यांच्या जवळचे आणि विश्वासू मानले जातात. सुभाष देसाई हे शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. ते मुख्यनेत्यांपैकीही एक नेते आहेत. सुभाष देसाई हे सध्या गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…