मोठी बातमी ; मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन यांनी दिला मंत्रीपदाचा राजीनामा…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांनी मंत्रिमंडळातील आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला असल्याचे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे.

मनीष सिसोदियांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्लीचे उपमुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे नेते मनीष सिसोदिया यांना आज सर्वोच्च न्यायालयाने झटका दिला. मद्य घोटाळाप्रकरणी सीबीआयने अटक केलेल्या कारवाईविरोधात त्यांनी दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालये फेटाळली असून, सिसोदिया यांनी उच्च न्यायालयात दाद मागावी, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
रविवार, २६ रोजी तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर केंद्रीय गुन्हे अन्वेशन (सीबीआय) विभागाने मनीष सिसोदिया यांना अटक केली होती. सोमवारी त्यांना सीबीआय विशेष न्यायालयात दाखल करण्यात आले. यावेळी त्यांना ४ मार्चपर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली होती. अटकेच्या कारवाईविरोधात सिसोदिया यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
नायब राज्यपाल व्हीके सक्सेनांनी केली होती सीबीआय चौकशीची शिफारस
दिल्लीतील नवीन मद्य धोरणातील भ्रष्टाचार प्रकरणी जुलै २०२२ मध्ये दिल्लीचे नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांनी मनीष सिसोदिया यांच्या विरोधात सीबीआय चौकशीची शिफारस केली. सक्सेना यांनी सिसोदिया यांनी नियमांकडे दुर्लक्ष करून भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. यानंतर ईडी आणि सीबीआयने सिसोदियाविरुद्ध तपास सुरू केला होता.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…