‘वेटिंग’वर असलेल्या त्या आठ IPS अधिकाऱ्यासह 10 वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या, पाहा यादी…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
यामध्ये बऱ्याच दिवसांपासून बदलीच्या प्रतिक्षेत असलेल्या 8 आयपीएस अधिकाऱ्यांना अखेर पोस्टिंग मिळाली आहे. त्यामध्ये बिपिन कुमार सिंह यांची आर्थिक गुन्हे शाखेच्या अपर पोलिस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे तर प्रभात कुमार यांना होमगार्डची जबाबदारी देण्यात आली आहे. इतर अधिकाऱ्यांना साईड पोस्टिंग देण्यात आल्या आहेत. राज्यातील एकूण 11 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गृह मंत्रालयाने जारी केले आहेत.
गेल्या कित्येक दिवसांपासून नियुक्तीचा प्रतीक्षेत असलेल्या वरिष्ठ पोलिस आधिकाऱ्यांना पोस्टिंग देण्यात आली आहे. बिपीनकुमार सिंह यांची आर्थिक गुन्हे शाखेच्या अप्पर पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर राजकुमार व्हटकर यांची विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशिक्षण व खास पथकेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विनीत अग्रवाल यांची म्हाडाच्या अपर पोलीस महासंचालक व मुख्य दक्षता अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रभात कुमार यांची उप महासमादेशक होमगार्डपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी जय जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर
कैसर खालिद यांची मोटार परिवहन विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. डी के पाटील भुजबळ यांची गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नांदेड विभागाच्या पोलीस उपमहानिरीक्षकपदी एस एच महावरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
याचसोबत राज्यातील इतर अधिकाऱ्यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये अभिजीत शिवथरे यांना कायदा आणि सुव्यवस्था विभागाच्या सहायक पोलिस महानिरीक्षकपदी नियुक्ती देण्यात आली आहे. तर पौर्णिमा चौगुले यांना मीरा-भाईंदर-वसई-विरारच्या पोलिस उपायुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. राहुल खाडे यांची बदली जालना जिल्ह्याच्या अपर पोलिस अधिक्षकपदी करण्यात आली आहे.
या आधी 15 दिवसांपूर्वी राज्यातील वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या.
IAS Transfer: या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या
1. राजेंद्र भोसले, IAS (2008), या आधी अहमदनगरचे जिल्हाधिकारी, आता मुंबई उपनगर जिल्हाधिकारीपदी नियुक्ती.
2. दिपा मुधोळ मुंडे, IAS (2011) या आधी औरंगाबाद CIDCO च्या मुख्य प्रशासक, आता बीडच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती.
3. राधाविनोद शर्मा, IAS (2011) या आधी बीडचे जिल्हाधिकारी, आता औरंगाबाद CIDCO च्या मुख्य प्रशासकपदी नियुक्ती.
4 सिद्धार्थ सालीमथ, IAS (2011) अहमदनगरच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती.
5 निधी चौधरी, IAS (2012) या आधी मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी, आता मुंबईतील विक्रीकर खात्याच्या सह-आयुक्तपदी नियुक्ती.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…