श्री गजानन महाराज आंबोडा श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ, अखंड हरिनाम सप्ताह यात्रा महोत्सवाची समाप्ती….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
उमरखेड :- संत गाडगेबाबा यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आंबोडा भूमी मध्ये मंगळवारपासून गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त भव्य यात्रेला सुरुवात झाली गजानन महाराज संस्थांच्या वतीने आठवडाभर विविध हरिभक्त पारायण वरील संतांचे मार्गदर्शन अखंड, हरिनाम सप्ताह यांचे वाचन व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले .मंगळवारी सकाळी गजानन महाराज मंदिरावर विजय बोंपिलवार सुधीर, नरवाडे डॉ. शशिकांत भांगे,संजयभाऊ कोपरकर, देवरावजी ठाकरे यांच्या हस्ते संपत्निक श्रीं च्या मूर्तीचा अभिषेक व आरती संपन्न झाली संस्थेच्या वतीने अध्यक्ष हणवंतराव देशमुख यांच्या हस्ते जोडप्यांचा सत्कार करण्यात आला. पंजाबराव राऊत पाटील यांच्याकडून पहिल्या दिवशी पारायण वाचन करण्यात आले. संस्थेचे सचिव श्री दिगंबर राव पतंगराव यांच्या उपस्थितीत प्रसादाची सुरुवात करण्यात आली.
दिनांक 13 /2 /2023 रोजी श्रीं चा अभिषेक भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नितीनजी भुतडा ,उमरखेड मतदार संघाचे विद्यमान आमदार नामदेवराव ससाने यांच्या हस्ते संपत्निक संपन्न झाला. संस्थेच्या वतीने श्री. हणवंतराव देशमुख व दिगंबर पतंगराव यांच्या कडून त्यांचा सत्कार करण्यात आला .
यावेळी बोलताना आमदार नामदेवराव ससाने यांनी श्री. गजानन महाराज संस्थान आंबोडा ला भविष्यात विकास कामाकरिता लागणाऱ्या भरघोस देऊ निधीची कमतरता पडू देणार नाही असे उपस्थित गजाननभक्त व गावकरी मंडळी यांना आश्वासन दिले.
नंतर श्री. गजानन महाराज ची पालखी शोभायात्रा काढण्यात आली. महागाव तालुका परिसरातील व बाहेरील दिंड्यांनी व भजनी मंडळांनी विशेष शोभा वाढविली होती.
प्रगट दिनानिमित्त बाल कीर्तनकार माऊली महाराज चाहुलकर आळंदी (देवाची) यांचे सुंदर किर्तन संपन्न झाले. तरुणांनी व्यसनांपासून दूर राहावे आई-वडिलांची सेवा करावी हे प्रवचनात विशद केले.
दिनांक 14/ 2/ 2023 रोजी मंगळवारी काल्याचे किर्तन ह. भ.प प्रसाद महाराज प्रसाद चोंडीकर आळंदी यांचे काल्याचे किर्तन संपन्न झाले व महाप्रसादाचे वितरण करण्यात आले .यावेळी महागाव तालुक्यातील व बाहेरील तालुक्यातील गजानन महाराज भक्तांनी कुटुंबासह महाप्रसादाचा लाभ घेतला.
या यात्रा महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी श्री. गजानन महाराज संस्थान चे अध्यक्ष हणवंतराव देशमुख, सुभाषराव उन्हाळे उपाध्यक्ष, दिगंबरराव पतंगराव सचिव ,श्रीराम जाधव विश्वस्त, दिपकराव राऊत पाटील विश्वस्त, अविनाश पतंगराव विश्वस्त ,किसनराव तायडे विश्वस्त, रोहिदास पाटे विश्वस्त, देवानंद दुपात्रे, भिमराव दांडेगावकर विश्वस्त ,श्रीकांत ठाकरे व पूर्ण गावकरी मंडळी यांनी विशेष श्रम घेतले