अजित पवारांची जीभ घसरली, शेतकऱ्यांना सल्ला देताना दादा म्हणाले…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- विरोधी पक्षनेते अजित पवार यांची जीभ पुन्हा एकदा घसरली आहे. शेतकऱ्यांना सल्ला देताना अजित पवार यांनी एक वक्तव्य केलं. जुन्नर तालुक्यातल्या नारायणगाव इथे ग्लोबल कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे.
या कार्यक्रमात अजित पवार बोलत होते, यावेळी बोलत असताना अजित पवारांची जीभ घसरली. देशाची लोकसंख्या वाढत आहे, त्यामुळे ती कमी करा, असा सल्लाही अजित पवारांनी दिला. ‘बाकीची प्रदर्शन राजकीय असतात, त्यांना पद, सत्ता मिळाली म्हणून तेही म्हणतात माझ्या मतदारसंघात प्रदर्शन घे. एक रेडा आणून बांधतात आणि म्हणतात इतक्या कोटींचा रेडा आहे.
त्याला काय करायचंय इतक्या कोटींचा रेडा? रेडा बघून दूध वाढणार आहे का?’ असं म्हणत अजित पवारांनी भर सभेत वक्तव्य केलं.
याच कार्यक्रमात अजित पवार यांनी लोकसंख्या वाढीवरही भाष्य केलं. ‘आपली लोकसंख्या भरमसाठ वाढत आहे.
1947 ला 35 कोटी लोकसंख्या होती आता सव्वाशे कोटी पार केली. 2021 ला जनगणना झालीच नाही, आता झाली की आकडा काय निघेल माहीत नाही. त्यानंतर कोरोना आला.कोरोनाला दुसरं कामच नव्हतं, म्हणजे शेतीचं काम होतं परंतू लॉकडाऊन होता आणि लोकं मोकळी बसली होती. हसण्यावारी नेऊ नका लोकसंख्या कमी करा’, असा टोलाही अजित पवार यांनी लगावला.