पुसद नगरपरिषद मध्ये शिष्यवृत्ती मार्गदर्शन शिबिर आयोजन…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- नगर परिषद (शिक्षण विभाग पुसद) अंतर्गत शिष्यवृत्ती मार्गदर्शन शिबीराचे आयोजन…
आज दि.1-2-2023 रोजी नगर परिषद द्वारा संचालित पुसद शहरातील मराठी , हिंदी व उर्दू माध्यमाच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5 वी तसेच राष्ट्रीय आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृती योजना इयत्ता 8 वी (N M M S ) साठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेच्या माध्यमातून् जास्तीतजास्त विद्यार्थाना परीक्षेची गोडी लागावी व शिष्यवृत्ती कशी मिळवता येईल या हेतूने न.प. शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी सदर शिबिराचे आयोजन केले होते .
कर्तव्यदक्ष , समाज हित जोपासणारे व न.प. शाळेविषयी जिव्हाळा जपणारे ,नेहमी सक्रिय पुढाकार घेत अनमोल असे सहकार्य करणारे नगरपरिषद पुसदचे मुख्याधिकारी मा. डॉ. श्री किरण सुकलवाड साहेब यांच्या संकल्पनेतून ह्या शिष्यवृत्ती मार्गदर्शन शिबिराचे आयोजन न.प. टाऊन हॉल मध्ये करण्यात आले होते.
सदर शिबिराचे उदघाटक म्हणून मा.डॉ.किरण सुकलवाड साहेब होते तर प्रमुख अतिथी म्हणून मा.प्रशासन अधिकारी श्री. अमोल मदने साहेब तसेच नगरपरिषद केंद्रप्रमुख श्री अमित बोजेवार सर होते.
या शिबिरासाठी तज्ञ मार्गदर्शक म्हणून दारव्हा नगरपरिषद शाळा क्र 2 चे मुख्याध्यापक श्री रमेश राठोड सर व राकेश मडावी सर तथा श्री पवार सर सहायक शिक्षक हे उपस्थित होते
श्री.राठोड सर व श्री राकेश मडावी सर यांनी आपल्या मार्गदर्शनमध्ये दारव्हा शाळेत राबविण्यात आलेल्या उपक्रमाविषयी माहिती दिली व शिष्यवृत्ती परीक्षा मधील यशस्वी त्याची वाटचालीचे गमक सर्वांपुढे सादर केले .
शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये कसे झळकतील यांचे मॉडेल सादर करून सांगितले.
सदर शिबिरामध्ये न.प.पुसद शाळेतील मराठी , हिंदी व उर्दू शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद उपस्थितत होते.
उपस्थित शिक्षकांनी दारव्हा न.प.चे शिष्यवृत्ती मॉडेल पुसद न.प. शिक्षण विभाग राबवेल याची हमी दिली.
सदर कार्यक्रमाचे नियोजन श्री सुनील तुकाराम जाधव सर , श्री उत्तम किसन जाधव सर, श्री शिवाजी टारफे सर , श्री मिलिंद सुरडकर सर ,यांनी केले तर कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन श्री प्रवीण कांबळे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री शिवाजी होडगीर सर यांनी केले..