सक्शन मशीन बंद असल्याने रुग्णाची होत आहे हेडसांड ; दिग्रस ग्रामिण रुग्णालयातील प्रकार ; प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने निवेदन सादर….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
दिग्रस :- दिग्रस ग्रामीण रुग्णालयातील सक्शन मशीन बंद असल्याने विष प्राशन करणाऱ्या रुग्णाची हेडसांड होत असल्याची बाब प्रहार जनशक्ती पक्षाचे युवा तालुकाध्यक्ष धीरज आडे यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी याबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ. अभय गोंविदवार यांना दि.१४ डिसेंबर २०२२ रोजी लेखी निवेदन देऊन सक्शन मशीन त्वरित सुरू करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला आहे.
ग्रामिण रुग्णालय दिग्रस येथे आज दि.१४ डिसेंबर रोजी वरंदळी या गावातील विष प्राशन केलेला रुग्ण गंभीर अवस्थेत उपचारासाठी आला असता ग्रामीण रुग्णालयातील सक्शन मशीन बंद असल्याने त्या रुग्णांना उपचारासाठी यवतमाळ शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. ही बाब गंभीर असून सक्शन मशीन त्वरित सुरू करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा वैद्यकीय अधीक्षक यांना निवेदनातून प्रहार जनशक्तीच्या वतीने देण्यात आला.
निवेदन देतेवेळी प्रहार जनशक्ती युवा तालुकाध्यक्ष धीरज आडे, सागर दुर्गे, तुकाराम राठोड, रुषभ आमटे, अमर मोरे, अंकित गायकवाड आदी उपस्थित होते.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…