औरंगाबादमध्ये भाजप, राष्ट्रवादीला खिंडार ; पदाधिकाऱ्यांनी ‘मातोश्री’वर बांंधलं शिवबंधन….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- ठाकरे गटाकडून शिंदे गटात इनकमिंग सुरू असताना आता ठाकरे गटाला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे.
आज या पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीवर जाऊन हाती शिवबंधन बांधल. नव्याने पक्षप्रवेश केलेल्या या सर्व पदाधिकाऱ्यांचं उद्धव ठाकरे यांनी स्वागत केलं आहे. यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई, संपर्कप्रमुख डॉ विनोद घोसाळकर यांची उपस्थिती होती. भाऊसाहेब पाटील चिकटगावकर ठाकरे गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, प्रतापराव पाटील निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रतापराव पाटील धोर्डे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे.
दुसरीकडे पैठणमध्ये देखील भाजपाला ठाकरे गटाने मोठा धक्का दिला आहे. बद्रीनाथ भुमरे पाटील, डॉ पांडुरंग राठोड, यांच्यासह भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आज ठाकरे गटात प्रवेश केला आहे.
एकीकडे ठाकरे गटातील एकएक पदाधिकारी शिंदे गटात जात असताना दुसरीकडे मात्र आता इतर पक्षातून ठाकरे गटात इनकमिंग सुरू झाल्याचं पहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच बुलडाणा जिल्ह्यातील भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर आता औरंगाबाद जिल्ह्यातील विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. औरंगाबादमध्ये यामुळे भाजपला मोठं खिंडार पडलं असून, ठाकरे गटाची ताकद वाढली आहे.