विजेचा शॉक लागून टिकटॉक स्टार संतोष मुंडेचा मृत्यू ; धनजंय मुंडेंनी वीजवितरण कंपनीला धरलं जबाबदार…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
बीड :- आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा टिकटॉक स्टार संतोष मुंडे याचे निधन झाले आहे. विजेचा धक्का लागून संतोषचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. निधनाची बातमी कळताच सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
संतोषसोबतच बाबुराव मुंडे यांचाही मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी रात्री घडली.
संतोष मुंडे आणि बाबुरा मुंडे हे दोघे डीपीचा फ्यूज बदलण्यासाठी गेले होते. यावेळी अचानक विद्युत पुरवठा सुरू झाल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. संतोष मुंडे हा फेमस टिकटॉक स्टार होता. त्याच्या निधनाची बातमी कळताच अनेकांनी दु:ख व्यक्त केले आहे.
संतोष मुंडे या ग्रामीण भागातील हरहुन्नरी तरुणाच्या मृत्यूप्रकरणी आमदार धनंजय मुंडे यांनी देखील शोक व्यक्त केला असून महावितरणच्या कारभारावरुन या कंपनीलाच जबाबदार धरलं आहे. त्यांनी म्हटलं की, शेतकऱ्यांच्या पोरांना ग्रामीण भागातील विजेचा लपंडाव आणि अपुऱ्या सुविधा यामुळं आपला जीव धोक्यात घालून स्वतः बरीच कामं करावी लागतात. या दुर्दैवी अपघाताची जबाबदारी महावितरणने घ्यावी, या अपघातात नेमकी कुणाची चूक आहे हे समोर आलं पाहिजे. संतोष व अपघाती मृत्यू झालेल्या अन्य तरुणाच्या कुटुंबास महावितरणने तात्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणीही धनंजय मुंडे यांनी केली आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…