पुसद येथे मराठा कुणबी समाज राज्यस्तरीय उपवर-वधू परिचय मेळाव्याचे आयोजन ; नऊ वर्षांपासून यशस्वी आयोजन….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- मराठा कुणबी समाज राज्यस्तरीय उपवर-वधू परिचय मेळाव्याचे आयोजन रविवारी (ता.१८) डिसेंबरला सकाळी १०.०० वा. स्वर्गीय शेषराव पाटील जिनिंग-प्रेसिंग पुसद जिल्हा यवतमाळ च्या भव्य प्रांगणात मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले आहे.
कार्यक्रमाला भारतीय काँग्रेस पार्टीचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, खासदार भावना गवळी, खासदार हेमंत पाटील,आमदार अॅड.किरण सरनाईक,माजी मंत्री डाॅ.रणजित पाटील,माजी मंत्री संजय देशमुख,माजी मंत्री सुभाष ठाकरे, माजी आमदार विजय पाटील चोंढीकर, माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर,माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर, ज्येष्ठ नेते जीवन पाटील,विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष वसंतराव घुईखेडकर,महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लिगल सेलचे प्रदेशाध्यक्ष ॲड. अाशिष देशमुख,पुसद अर्बन बॅंकेचे अध्यक्ष शरद मैन्द,प्रवीण देशमुख,नानाभाऊ गाडबैले,तातू देशमुख,राम देवसरकर,राजश्री पाटील,शिवाजीराव देशमुख सवनेकर,दिगंबर जगताप आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. गेल्या नऊ वर्षांपासून मराठा कुणबी समाज,मराठा युवा मंच व मराठा महिला मंडळ यांचेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यामध्ये विवाहोईच्छुक उपवर—उपवधूंची नोंदणी मोठ्या प्रमाणात झाली आहे.उद्घाटन सभारंभ प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते परीचय पुस्तिकेचे विमोचन करण्यात येणार आहे. आयोजित मेळाव्याला समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन दीपक काळे,शंकर गावंडे, सुशांत महल्ले यांचेसह पुसद,उमरखेड,महागाव व दिग्रस येथील मराठा कुणबी समाजच्या सर्व पदाधिकार्यांनी केले आहे.