ऋतुजा लटके यांचा विजय भाजपमुळेच – आशिष शेलार…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके यांना 66 हजार 247 मते मिळाली. तर, नोटा या पर्यायाला 12 हजार 776 मते मिळाली.
अंधेरी पूर्व पोटनिवडणूक निकाल घोषित झाला असून या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके वियजी झाल्या आहेत.
राजकीय वर्तुळातून सध्या ऋतुजा लटके (Rutuja Latake) यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तर भाजपकडून मात्र काहीशी वेगळी प्रतिक्रिया आली आहे. ऋतुजा लटके यांचा विजय भाजपमुळे झाला असून आम्ही निवडणूक लढवली असती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा पराभव निश्चित असता असे भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी म्हटले आहे.
अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा विजयी झाल्या. भाजपने या पोटनिवडणुकीत आपला उमेदवार उभा केला होता. मात्र, ऐनवेळी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यानंतर शिवसेना ठाकरे गट विरुद्ध अपक्ष असा सामना पाहायला मिळाला. मात्र, यामध्ये ऋतुजा लटके यांनी 53 हजार 471 मते मिळवत विजय मिळवला. दरम्यान, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी ऋतुजा लटके यांचं अभिनंदन केलं. मात्र यावेळी त्यांनी केलेलं ट्टिटवरुन आता चर्चेचा उधाण आलं आहे. शेलार यांनी म्हण्टलं आहे की, भाजपाच्या मदतीमुळे ऋतुजा लटके यांचा अंधेरी पूर्वमध्ये विजय झाला. त्यासाठी त्यांचे अभिनंदन. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाकप व इतर डझनभर पक्षांनी पाठिंबा देऊनही ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ गटाला अधिक मतदान झालेच नसल्याचे सांगत भाजपाने निवडणूक लढवली असती तर यांचा पराभव निश्चित होता असे शेलार यांनी म्हटले.

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके यांना 66 हजार 247 मते मिळाली. तर, नोटा या पर्यायाला 12 हजार 776 मते मिळाली. अपक्ष उमेदवार बाळा नाडर यांना 1506 मते मिळाली.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…