पुसद मार्केट यार्ड वर व्यापारीचा अवैद्य कब्जा…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- पुसद येथे शेतकऱ्यांना आपला शेत माल विक्री करता यावा म्हणून वरुड परिसरात भव्य अशा मार्केट यार्ड ची निर्मिती करण्यात आलेली आहे. या मार्केट यार्ड मध्ये शेतकऱ्यांना आपला शेतमाल ठेवण्यासाठी तीळभरही जागा नाही. परंतु व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला शेतकऱ्यांचा माल कित्येक महिन्यापासून मार्केटमध्ये साठवून ठेवण्यात आलेला आहे.
ऊन, वारा, पाऊस चा मारा झेलत शेतकरी रोडच्या कडेला आकाशाच्या मंडपाखाली आपला शेतमाल विक्री ला आणले असता ताटकळत बसावे लागते.
पुसद मार्केट यार्ड चे कर्मचारी कधीच वेळेवर मार्केट यार्ड मध्ये येत नाही. परिणामी शेतकऱ्यांच्या मालाची विक्री हरास करण्यास विलंब होतो. व त्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो.
पुसद येथील मार्केट यार्ड मध्ये शेतकऱ्याच्या मालाला हमीभावापेक्षा कमी दराने व्यापारी माल खरेदी करून शेतकऱ्यांची आर्थिक लूट करीत असल्याची बाबही शेतकरी वर्गात चर्चा आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करण्यात येऊ नये तसे करणाऱ्या व्यापाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी पुसद शिवसेना शिंदे गटाचे अनिल चव्हाण (पाटील) यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

पुसद मार्केट यार्ड मध्ये वजन, मापे यांच्यामध्ये सुद्धा गडबड करून शेतकऱ्यांचा शेतमाल व्यापारी दिवसाढवळ्या राजरोसपणे लुटत असल्याचेही त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.पुसद तालुका निबंधक यांनी संबंधित शेतकऱ्यांच्या समस्येचे निराकरण करण्याचे दृष्टीने योग्य ती कारवाई करावी. अशी निवेदना मधून मागणी केलेली आहे.

शेतकऱ्यांच्या हिताचे कार्य पुसद मार्केट यार्ड मध्ये जर होत राहिले नाही तर जनआंदोलन उभारण्याचा इशाराही शिवसेना पुसद शिंदे गटाचे अनिल चव्हाण (पाटील) यांनी दिला आहे. तालुका निबंधक सहकारी संस्था हे काय निर्णय घेतात याकडे तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे…

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…