मुंबई सेन्ट्रल ते गांधीनगर वंदे भारत एक्सप्रेस आजपासून ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गांधीनगर येथे गाडीला हिरवा कंदिल….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- ‘मेक इन इंडिया’अंतर्गत तयार करण्यात आलेली वातानुकूलित ‘वंदे भारत एक्सप्रेस’ पश्चिम रेल्वेवर मुंबई सेन्ट्रल-गांधीनगर-मुंबई सेन्ट्रल दरम्यान धावणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गांधीनगर कॅपिटल रेल्वे स्थानकात उद्या, शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता या गाडीला हिरवा कंदिल दाखवणार आहेत. ही एक्सप्रेस १ ऑक्टोबरपासून नियमितपणे प्रवाशांच्या सेवेत येणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली. सहा तास २० मिनिटांत मुंबई सेन्ट्रल ते गांधीनगर कॅपिटल स्थानक प्रवास पूर्ण होणार आहे.
संपूर्ण वातानुकूलित असलेल्या या एक्सप्रेसमध्ये आरामदायी आसनव्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे, बायोटॉयलेट अशा विविध सुविधा आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या गाडीला हिरवा झेंडा दाखविल्यानंतर अहमदाबाद येथून दुपारी दोन वाजता ती सुटेल. त्याच दिवशी सायंकाळी ७.३५ वाजता मुंबई सेन्ट्रल टर्मिनसला पोहोचणार आहे. ही एक्सप्रेस १ ऑक्टोबरपासून नियमितपणे प्रवाशांच्या सेवेत येईल. रविवार वगळता उर्वरित सहा दिवस ही गाडी प्रवाशांच्या सेवेत उपलब्ध असणार आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…