विविध सघंटना व राजकीय पक्षां तर्फे पुसद येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात “रास्ता रोको’ आंदोलन….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- पुसद नगर परिषद अंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा मागील अनेक वर्षापासून अतिक्रणाच्या विळाख्यात अडकलेला आहे. त्यामुळे या पुतळ्याचे सौंदर्यकरण अद्याप पर्यंत करण्यात आलेले नाही त्यामुळे आज छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्ष तसेच समाज बांधवांच्या वतीने आज २८ सप्टेंबर 2022 रोजी चक्काजाम रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील अनेक दारू, मटन, मच्छी, व इतर अनेक दुकाने अतिक्रमित असून येथे दारूच्या दुकानातील दारुडे हे दारू पीऊन जात असतांना पुतळ्याजवळ अनेक वेळा त्यांच्या हातातील मटणाचे आणि मच्छीचे पिशव्या टाकून बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची अनेक वेळा विटंबना झालेली आहे तरीही प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी या विषयाकडे कधीही लक्ष देऊन पुढाकार घेतला नाही त्यामुळे या झोपेचे सोंग घेणाऱ्या प्रशासन व लोकप्रतिनिधींना जागे करण्यासाठी आज सर्व समावेशक सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व समाज बांधवांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेला आहे येत्या पंधरा(१५) दिवसात नगर परिषद प्रशासनाने बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या परिसराचे अतिक्रमण काढून पुतळ्याचे सुशोभीकरणास सुरुवात न केल्यास पुढील काळात जेलभरो आंदोलन सुद्धा करण्याचा इशारा या रास्ता रोको आंदोलनाच्या वेळी सहभागी संघटनेच्या वतीने देण्यात आला आज रास्ता रोको आंदोलनात एकूण (२२)सहभागी असलेल्या संघटना.. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) शिवसेना, भिम टायगर सेना, संभाजी ब्रिगेड, बिरसा मुंडा ब्रिगेड, मराठा सेवा संघ, आम आदमी पार्टी, एमआयएम पक्ष, लहुजी शक्ती सेना, तांडा सुधार समिती, बहुजन क्रांती मोर्चा, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद, मुव्हमेंट फॉर पीस अँड जस्टीस पुसद,अखिल भारतीय बंजारा सेना, मातृभूमी फाउंडेशन, अखिल भारतीय आदिवासी युवा परिषद, गोर सेना, संवाद सरपंच संघटना, माणुसकीची भिंत, भीम बॉईज ग्रुप, ग्रामीण पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य पुसद, इत्यादी ,सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनी सहभाग नोंदवून आज रास्ता रोको चक्काजाम आंदोलन केले आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…