संजय राऊतांच्या कोठडीत वाढ; जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- पत्राचाळ आर्थिक घोटाळा प्रकरणात शिवसेना नेते खासदार संजय राऊत (sanjay raut) यांचा आर्थर रोड कारागृहामधील मुक्काम वाढला आहे.
संजय राऊतांच्या जामीन अर्जावर आज न्यायालयात सुनावणी झाली.
या सुनावणी दरम्यान राऊतांना दिलासा मिळाला नसून न्यायालयाने जामीन अर्जावरील सुनावणी १० ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली आहे. त्यामुळे यंदाच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यालाही राऊत उपस्थित राहू शकणार नाहीत.
राऊतांना गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीने जून महिन्यात अटक केली होती. त्यानंतर राऊत यांना कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. तर जामीन मिळावा या करता राऊतांनी न्यायालयाकडे अर्ज केला होता. या अर्जावरील सुनावणीसाठी राऊतांना आज PMLA न्यायालयात हजर केले यावेळी ईडीने युक्तिवाद करण्यासाठी पुढची तारीख मागितली. त्यानुसार न्यायालयाने आता १० ऑक्टोंबरपर्यंत सुनावणी पुढे ढकलली आहे. त्यामुळे १० तारखेपर्यंत राऊतांचा तुरुंगातला मुक्काम वाढला आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…