गुलाम नबी आझाद यांच्याकडून नव्या पक्षाची घोषणा….!
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
श्रीनगर :- जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी सोमवारी नव्या पक्षाची घोषणा केली आहे. पत्रकार परिषद घेत त्यांनी आपल्या पक्षाचे नाव जाहीर केले आहे.
गुलाबनबी आझाद यांनी आपल्या पक्षाचं नाव ‘डेमोक्रेटिक आझाद पार्टी’ असे घोषित केलं आहे. गेल्या महिन्यात आझाद यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती.
गुलाम नबी आझाद यांनी आज जम्मूत पत्रकारपरिषद घेतली. यावेळी आझाद म्हणाले, ‘आमचे राजकारण जात किंवा धर्मावर आधारित असणार नाही. आम्ही सर्व धर्म आणि राजकीय पक्षांचा आदर करू. मी कधीही कोणत्याही पक्षावर किंवा नेत्यांवर वैयक्तिक हल्ले केले नाहीत. मी धोरणांवर टीका करतो. राजकीय नेत्यांवर वैयक्तिक हल्ले करणे टाळले पाहिजे’.
गुलाम नबी आझाद जम्मू-काश्मीरच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. काँग्रेस सोडल्यानंतरही गुलाम नबी आझाद यांनी राज्याचा दौरा केला होता. यादरम्यान गुलाम नबी आझाद यांनी नव्या पक्षासाठी समर्थकांशी चर्चा केली आणि दिल्लीत पक्षाच्या नावाबाबत विचारमंथन केले. नव्या पक्षाची विचारधारा त्यांच्या नावासारखी असेल आणि त्यात फक्त सर्व धर्मनिरपेक्ष लोकच सहभागी होऊ शकतील, असे त्यांनी सांगितले होते.

26 ऑगस्ट रोजी काँग्रेसमधून राजीनामा दिला
गुलाम नबी आझाद यांनी 26 ऑगस्ट रोजी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. राजीनामा देण्यासोबतच आझाद यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही जोरदार हल्ला चढवला होता. आझाद यांच्या राजीनाम्यानंतर माजी उपमुख्यमंत्री, 8 माजी मंत्री, एक माजी खासदार, 9 आमदार, पंचायत राज संस्थानचे मोठ्या संख्येने सदस्य, जम्मू-काश्मीरमधील नगरपरिषद आणि तळागाळातील अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला होता.
1973 मध्ये गुलाम नबी आझाद यांनी डोडा जिल्ह्यातील भालेसा ब्लॉक काँग्रेस कमिटीचे सचिव म्हणून राजकारणात प्रवेश केला होता. यानंतर त्यांची कार्यशैली पाहून काँग्रेसने त्यांची युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड केली होती. 1980 मध्ये त्यांनी महाराष्ट्रातून पहिली लोकसभा निवडणूक लढवली आणि त्यात विजयी पतका फडकवली होती. त्यानंतर 1982 मध्ये त्यांचा केंद्रीय मंत्री म्हणून मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…