बनावट जॉब रॅकेटविरोधात परराष्ट्र मंत्रालयाकडून मार्गदर्शक सुचना, भारतीयांनी ‘अशा’ नोकरीच्या आमिषाला बळी पडू नये…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- आयटी (IT) कुशल तरुणांना लक्ष्य करणाऱ्या बनावट जॉब रॅकेटबाबत परराष्ट्र मंत्रालयाने एक मार्गदर्शक सूचना जारी केली आहे.
अॅडव्हायझरीमध्ये म्हटले आहे की, तरुणांना बेकायदेशीरपणे म्यानमारला नेण्यात येते आणि त्यांना कठीण परिस्थितीत काम करण्यासाठी बंदिस्त केले गेले. अॅडव्हायझरीत सांगण्यात आले की, भारतीय नागरिकांनी अशा बनावट नोकरीच्या ऑफरला बळी पडू नये.
बनावट नोकरीचे रॅकेट सुरू
मंत्रालयाने म्हटलंय की, कॉल सेंटर घोटाळे आणि क्रिप्टो-चलन फसवणुकीत गुंतल्याचा संशय असलेल्या आयटी कंपन्या भारतीय तरुणांना डिजिटल विक्री तसेच अधिकाऱ्यांच्या पदांसाठी विविध आकर्षक ऑफर्स देतात. अशी आमिषे देऊन या कंपन्या नोकरीचे बनावट रॅकेट चालवत आहे. त्याचवेळी, थायलंड, बँकॉक आणि म्यानमारमधील मिशन्सनी या बाबी मंत्रालयाच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत.

भारतीय नागरिकांना दिला सल्ला
आयटी-कुशल तरुण जे परदेशातील नोकरीसाठी सोशल मीडियावरील जाहिराती तसेच दुबई आणि भारतातील एजंट, सल्लागार यांच्याशी संपर्क साधतात. या पार्श्वभूमीवर, भारतीय नागरिकांना सल्ला दिला जातो की, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म किंवा इतर स्त्रोतांद्वारे जारी केल्या जाणार्या अशा बनावट जॉब ऑफर येऊ नयेत आणि लोकांना देखील याबद्दल माहिती द्यावी. रोजगारासाठी पर्यटक/व्हिजिट व्हिसावर प्रवास करण्यापूर्वी, भारतीय नागरिकांना संबंधित मिशनद्वारे ओळखपत्रे तपासण्याचाही सल्ला दिला जातो.
150 लोक अजूनही अडकले
याआधी शुक्रवारी, परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, त्यांनी म्यानमारमधील जॉब स्मगलिंग रॅकेटमध्ये गुंतलेल्या चार कंपन्यांची ओळख पटवली आहे आणि त्या भारतीयांना सोडवण्याचे काम करत आहेत. सुमारे 100 ते 150 भारतीय तरुण जे अजूनही तेथे अडकले आहेत. आतापर्यंत 32 जणांना वाचवण्यात अधिकाऱ्यांना यश आले आहे. तर, हैदराबाद आणि दिल्लीतील लोक जे परत जाण्यात यशस्वी झाले आहेत त्यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले की, तेथे किमान 500 भारतीय अडकले असल्याचे मानले जाते.
आयटी कुशल तरुणांना सल्ला
परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आलं की, कॉल-सेंटर घोटाळा आणि क्रिप्टो-चलन फसवणुकीत गुंतलेल्या संशयास्पद आयटी कंपन्यांकडून थायलंडमधील ‘डिजिटल सेल्स अँड मार्केटिंग एक्झिक्युटिव्हज’ या पदांसाठी भारतीय तरुणांना आकर्षक नोकऱ्या देण्याचे बनावट जॉब रॅकेट आमच्या मिशनच्या अलीकडेच निदर्शनास आले आहे. हे आमच्या बँकॉक आणि म्यानमार दुतावासाने लक्षात आणून दिले आहे. यांचे लक्ष्य आयटी कुशल तरुण आहेत. ज्यांना सोशल मीडिया जाहिरातींद्वारे तसेच दुबई आणि भारतातील एजंट्सद्वारे थायलंडमध्ये आकर्षक डेटा एन्ट्री नोकऱ्यांच्या नावाखाली फसवले जाते आहे. पीडितांना सीमा ओलांडून बेकायदेशीरपणे म्यानमारमध्ये नेले जाते आणि त्यांना कठोर परिस्थितीत काम करण्यासाठी बंदिवान केले जाते.
अशाप्रकारच्या बनावट नोकरीच्या ऑफरमध्ये अडकू नका
म्हणून, भारतीय नागरिकांना सल्ला दिला जातो की सोशल मीडिया प्लॅटफॉर्म किंवा इतर स्त्रोतांद्वारे अशा बनावट नोकरीच्या ऑफरमध्ये अडकू नका. रोजगाराच्या उद्देशाने टुरिस्ट/व्हिजिट व्हिसावर प्रवास करण्यापूर्वी, भारतीय नागरिकांना कोणत्याही नोकरीची ऑफर घेण्यापूर्वी परदेशातील संबंधित मिशनद्वारे परदेशी नियोक्त्यांची ओळखपत्रे आणि रिक्रूटिंग एजंट तसेच कोणत्याही कंपनीच्या पूर्ववृत्तांची तपासणी/पडताळणी करण्याचा सल्ला दिला जातो.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…