फडणवीस-पंकजा मुंडेंचा एकाच चॉपरमधून प्रवास ; नाराजी दूर झाली का..?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
आष्टी (बीड) :- सत्तांतरानंतर झालेल्या मंत्री मंडळाच्या विस्तारात पंकजा मुंडे यांना स्थान न देण्यात आल्याने त्या नाराज असल्याचे सांगितले जात होते. मात्र, आज आष्टी येथील कार्यक्रमात पंकजा मुंडे आणि उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही एकाच चॉपरमधून दाखल झाले.
त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, पद नाकारल्याने नाराज पंकजांची नाराजी दूर झाली का? असा प्रश्न यामुळे विचारला जात आहे.
दरम्यान, दोन्ही नेत्यांचा एकत्र प्रवास करण्याचा योग जुळून आल्याने हे पक्षाच्या दृष्टीने चांगली सुरूवात असल्याचे अनेकांचे मत आहे. पंकजा मुंडे या पुण्यात होत्या, तर फडणवीस नागपूर येथून पुण्यात दाखल झाले. त्यानंतर हे दोन्ही नेते एकाच चॉपरमधून आष्टी येथे दाखल झाले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, पद न दिल्याने नाराज झालेल्या पंकजा मुंडेंची नाराजी दूर झाली आहे का? असा प्रश्न या एकत्र प्रवासामुळे उपस्थित केला जात आहे.
गोपीनाथ मुंडेंच्या नावाची मागणी करणार नाही
दरम्यान, कार्यक्रमात बोलताना या कामाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाते, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. बीड लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारादरम्यान दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे आश्वासन मोदींनी दिले होते. हे आश्वासन आज पूर्ण झाले आहे. मात्र, या रेल्वेमार्गाला दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे नाव देण्याची मागणी करणार नसल्याचे पंकजा मुंडेंनी स्पष्ट केले आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…