‘एक जिल्हा एक उत्पादन’ व गुंतवणुक वृध्दीवर कार्यशाळा…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि. 23 सप्टेंबर :- उद्योग विभाग महाराष्ट्र शासन आणि जिल्हा उद्योग केंद्र, यवतमाळ यांचे तर्फे यवतमाळ जिल्ह्यातील उद्योजकांसाठी गुंतवणूक वृध्दी कार्यक्रम तसेच निर्यात प्रचलन तसेच एक जिल्हा एक उत्पादन या विषयावर 24 सप्टेंबर रोजी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन हॉटेल झुलेलाल प्राईड, दारव्हा रोड, यवतमाळ येथे सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत करण्यात आले आहे.
सदर कार्यशाळेमध्ये उद्योग विभागाचे अधिकाऱ्यांमार्फत गुंतवणुक वृध्दी तसेच निर्यात प्रचलन आणि एक जिल्हा एक उत्पादन या विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच उद्योजकांना येणाऱ्या समस्येबाबत परिसंवाद आयोजित केला असून त्यामध्ये सदर समस्या सोडविण्याबाबत चर्चा करण्यांत येणार आहे. उद्योग विभागाचे सहकार्याने उद्योग सुरु केलेल्या उद्योजकांचे उत्पादनांचे प्रदर्शन सुध्दा सदर ठिकाणी लावण्यात येणार आहेत. तरी यवतमाळ जिल्ह्यातील सर्व उद्योजकांनी सदर कार्यशाळेस व प्रदर्शनीस उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निलेश निकम यांनी केले आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…