MIM कार्यकर्त्याच्या हत्येचा प्रयत्न ; मुंब्र्यातील कार्यालयाची तोडफोड…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
ठाणे :- एमआयएम पक्षाच्या कार्यालयावर आणि कार्यकर्त्यावर अज्ञातांनी हल्ला केल्यामुळे मुंब्रा येथे काल (गुरुवारी) रात्री तणाव निर्माण झाला होता, आता या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.
याप्रकरणी पोलिसांनी १० ते १२ अज्ञातांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
गुरुवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. १० ते १२ हल्लेखोरांनी ठाण्यातील मुंब्रा येथे असलेल्या एमआयएम पक्षाच्या कार्यालयावर आणि कार्यकर्त्यावर हल्ला केला.या हल्ल्यात एमआयएमच्या कार्यकर्ता गंभीर जखमी झाला आहे. हल्लेखोरांनी एमआयएमच्या कार्यालयाची तोडफोड केली आहे. जखमीला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आली आहे.
हा हल्ला माझा खून करण्यासाठी करण्यात आल्याचा आरोप एमआयएमचे नेते सैफ पठान यांनी केला आहे. “माझ्यावर खोटी केस लावत मला कारागृहात पाठविले आणि त्यानंतर मला मारून टाकणार असे काही जण परिसरात बोलत होते,” असा आरोप मुंब्रा विधानसभा एमआयएम अध्यक्ष नेते सैफ पठान यांनी केला आहे.
रॉड, कोयते घेऊन १० ते १२ अज्ञात व्यक्तींनी एमआयएमच्या कार्यालयाची तोडफोड केल्याची तक्रार सय्यद पठाण यांनी पोलिसांकडे केली आहे. बिलाल असं हल्ला झालेल्या तरूणाचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले, पोलिस अधिक तपास करीत आहेत.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…