दसराच्या मेळाव्यात ठाकरे परिवार हुकूमाचा एक्का बाहेर काढणार…? ; नव्या पोस्टरची चर्चा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- शिवसेनेचा दसरा मेळावा एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखाली होणार की उद्धव ठाकरेंच्या, हा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. सध्या राज्यभरात दसरा मेळाव्याचीच चर्चा आहे. दादरमधल्या शिवाजी पार्कवर कोण दसरा मेळावा घेणार हे अद्याप ठरलेलं नसलं तरीही आता शिवसेनेकडून मेळाव्याचे पोस्टर्स प्रदर्शित करण्यात आले आहे.
यामध्ये तेजस ठाकरेंचा फोटो दिसल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
शिवसेनेने आता दसरा मेळाव्याचे पोस्टर्स सोशल मीडियावर व्हायरल केले आहे. यामध्ये उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह तेजस ठाकरेंचाही फोटो लावण्यात आला आहे. तसंच या पोस्टरवर दसरा मेळाव्याचा पत्ता शिवाजी पार्क हाच देण्यात आला आहे. त्यामुळे आता दसरा मेळाव्याच्या निमित्ताने तेजस ठाकरेंची राजकारणात एन्ट्री होण्याची चर्चा सध्या होऊ लागली आहे. त्यामुळे यंदाच्या दसरा मेळाव्यात तेजस ठाकरे लाँच होणार असल्याचं दिसत आहे.
या पोस्टरमधून “आता ताकद दाखवणारच, गद्दारांना क्षमा नाही, चलो शिवतीर्थ” असा संदेशही देण्यात आला आहे. दसरा मेळाव्याची जागा अद्यापही ठरलेली नाही. शिवाजी पार्कवर होणार की आणखी कुठे याबद्दलची चर्चा आता सुरू आहे. यापूर्वीही दसरा मेळाव्याचे पोस्टर शिवसेनेकडून प्रसारित करण्यात आले होते. जर शिवाजी पार्क मिळालं नाही, तर रस्त्यात उभं राहून भाषण करण्याची तयारीही उद्धव ठाकरेंनी दर्शवली आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…