शिवतीर्थावर दसरा मेळावा कुणाचा…? ; मुंबई पालिकेचं ठरलं पण निर्णय ढकला पुढे….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- शिवसेनेमध्ये दोन गट निर्माण झाल्यामुळे दसरा मेळावा घेण्यासाठी शिंदे गटही पुढे सरसावला आहे. त्यामुळे दरवर्षी शिवतीर्थावर होणारा दसरा मेळावा कोण घेणार यावर सस्पेन्स निर्माण झाला आहे.
मुंबई महापालिकेनं वाद आणि दबाव पाहता निर्णय दोन दिवस पुढे ढकलला आहे. तसंच कायद्या सुव्यवस्थेचा मुद्दा लक्षात घेता कुणालाही परवानगी देऊ नये, असा सूरही पालिका अधिकाऱ्यांनी लावला. शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेना आक्रमक झाली आहे. तर शिंदे गटानेही दादर येथील छत्रपती शिवाजी पार्क अर्थात शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी मुंबई पालिकेकडे अर्ज केला आहे.
मात्र, दसरा मेळाव्याकरता शिवाजी पार्क कुणाचं याचा निर्णय येत्या दोन दिवसांत होणार आहे. 22 तारखेपर्यंत मुंबई पालिका दोन्ही गटांच्या अर्जांना उत्तर देऊ शकेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
दसरा मेळावा कोण घेणार या मुद्द्यावरुन होणारं राजकारण आणि वाढता दबाव पहाता महापालिका निर्णयाकरता आणखी २ दिवस घेणार आहे. शांतता-सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवणार असल्याने कोणत्याच गटाला परवानगी दिली जाऊ नये असं मत पालिका अधिकाऱ्यांच्या चर्चेत मांडले जात आहे.
दरम्यान, शिंदे गटाने बीकेसी मैदानावर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी मागितली होती. याबद्दल शिंदे गटाला परवानगी देण्यात आली आहे. मात्र, शिंदे गटाने शिवतीर्थासाठी अर्ज दाखल केलेला आहे. दरम्यान, शिवसेनेच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन शिंदे गटाला आवाहन केले आहे.
‘आपला देश संविधानावर चालतो. हा आलेला निर्णय त्यांनी लढाऊ वृत्तीने स्वीकारतील अशी अपेक्षा आहे. प्रशासक आहेत त्यामुळे ते कारवाई करतील. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यंमत्री शिंदे हे कायद्याला माणणारे आहे असे मी मानते.
काही लोक समीकरण बदलू पहात आहे. गेली ५६ वर्ष हा दसरा मेळावा सुरू आहे. लोक बाळासाहेबांना बघण्यासाठी येत होते तिथून बाळासाहेबांनी उद्धवजी आणि आदित्यबद्दल सांगितले होते, असं भावनिक आवाहन पेडणेकर यांनी केलं. ‘कायदा सुव्यवस्था बिघडू नये. हेच आम्हाला वाटते. त्यामुळे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी आम्हाला परवानगी द्यावी असे आम्हाला वाटते, असंही पेडणेकर म्हणाल्या.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…