“शिवसेना आणि शिवाजी पार्क हे अतूट नाते” ; शरद पवार यांचे स्पष्ट मत….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- शिवसेना आणि शिवाजी पार्क हे अतूट नाते आहे. गेल्या 40-45 वर्षांपासून शिवाजी पार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा होत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरे हे नेतृत्व करत असल्यामुळे शिवाजी पार्कवर मेळावा घेण्याचा त्यांचाच हक्क आहे, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडले.
दरम्यान, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांना ईडीने विनाकारण अटक केली आहे, असे पवार यांनी स्पष्टपणे सांगितले.
कुर्डूवाडी पंचायत समितीच्या आवारात माजी आमदार पै. विठ्ठलराव शिंदे यांच्या पूर्णाकृती पुतळय़ाचे अनावरण शरद पवार यांच्या हस्ते झाले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. यावेळी माजी मंत्री धनंजय मुंडे, आमदार बबनराव शिंदे व आमदार संजयमामा शिंदे उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे हे दसरा मेळावा घेऊ शकतात. यासाठी त्यांना बीकेसीचे मैदान मिळाले आहे. त्यामुळे त्यांनी इतरांना विरोध करण्याचे कारण नाही. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची शिवसेनेची परंपरा आहे. ती अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे शिवसेनेला शिवाजी पार्कवर परवानगी देणे आवश्यक आहे, असे शरद पवार म्हणाले.
आगामी 2024 च्या निवडणुकीत विरोधी पक्ष एकत्र लढेल का, असे विचारले असता पवार म्हणाले, मोदी सरकारविरोधात उतरण्याची सर्वांची इच्छा आहे. यासंदर्भात ममता बॅनर्जी व नितीशकुमार यांनी माझी भेट घेऊन मते मांडली आहेत. मात्र, त्याबाबत ठोस निर्णय झालेला नाही. यामध्ये काँग्रेस पक्षाचा कसलाही अडसर नसल्याचे पवार यांनी सांगितले.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे नाना पटोले म्हणतात, त्यावर ‘त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत’. काँग्रेसला सोबत घेऊ नये असे काहींचे म्हणणे आहे; पण काँग्रेस हा मोठा पक्ष आहे. कोणी कोणाला सोबत घ्यावे अशी भूमिका राजकारणात नसावी, असेही शरद पवार यांनी सांगितले.
संजय राऊत यांना विनाकारण अटक!
कोणतेही कारण नसताना शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. हा सत्तेचा गैरवापर आहे. त्याचप्रमाणे नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनाही विनाकारण तुरुंगात टाकले आहे. आम्ही त्यांना वाऱ्यावर सोडले, असे म्हणण्यात काही तथ्य नाही, असेही शरद पवार यांनी सांगितले.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…