मोठी बातमी ; शशी थरूर कॉंग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढनार ; सोनिया गांधीकडून हिरवा कंदील…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- राहुल गांधी यांची काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती करावी यासाठी विविध राज्यातील काँग्रेस प्रतिनिधीमंडळं एकमताने ठराव मंजूर करत असतानाच आता ज्येष्ठ नेते शशी थरूरही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.
माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढणार आहेत. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडूनही त्यांना हिरवा कंदिल मिळाल्याचे वृत्त पत्रकारांनी सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी या सोमवारी विदेश दौऱ्यावर मायदेशी परतल्या. त्यानंतर शशी थरूर यांनी त्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान काँग्रेसचे अन्य नेतेही उपस्थित होते. या भेटीदरम्यानच शशी थरूर यांनी अध्यक्षपदाची निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांच्या इच्छेचा मान राखत कोणीही निवडणूक लढवू शकतो असे म्हणत सोनिया गांधी यांनी त्यांना हिरवा कंदिल दिल्याचे वृत्त आहे.

पत्राद्वारे केली होती मागणी
काँग्रेसमध्ये पक्षाध्यक्ष निवडणुकीचे वारे वाहू लागल्यानंतर काँग्रेसमधील 5 वरिष्ठ खासदारांनी ‘लेटर बॉम्ब’ टाकला होता. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुका निष्पक्षपाती आणि पारदर्शक व्हाव्यात, अशी या पाच खासदारांची मागणी होती. निवडणुकीच्या निष्पक्षपातीपणाबाबत चिंता व्यक्त करत त्यांनी पक्षाचे निवडणूक प्रक्रियेचे प्रमुख मधुसुदन मिस्त्री यांना पत्र लिहिले होते. क्षाचे वरिष्ठ नेते शशी थरूर, मनीष तिवारी, कार्ती चिदंबरम, प्रद्युत बारदोलाई आणि आर. अब्दुल खालिक यांनी मिस्त्री यांना हे पत्र लिहिले होते. मात्र त्यांची ही मागणी फेटाळून लावण्यात आली होती.
सात राज्यांचा ठराव
काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी सध्या ‘भारत जोडो यात्रे’ मध्ये व्यस्त असून पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. याच दरम्यान त्यांना पुन्हा पक्षाध्यक्ष करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. राजस्थान, गुजरात, छत्तीसगड, बिहार, जम्मू-कश्मीर, हिमाचल प्रदेशनंतर आता महाराष्ट्र काँग्रेसमध्येही यासंबंधीचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…