धक्कादायक ! इजनी येथे ११ वर्षीय मुलीवर बलात्कार
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :
पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ईजनी येथे ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर एका नराधमाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना काल (ता.१६) दुपारी समोर आली आहे.समाजाला काळीमा फासणाऱ्या या घटनेने समाजमनसुन्न झाले आहे.या सर्व प्रकारानंतर पीडित मुलगी आजारी पडल्याने सर्व प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी ४ आरोपी विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , पीडित तरुणीचे वडील मोलमजुरी करतात तर आई घरकाम करून चरितार्थ चालवत. दरम्यान पीडित मुलगी घाबरलेल्या स्थितीत होती त्यामुळे ती मागील चार दिवसापासून आजारी होती.वडिलांनी मुलीला विश्वासात घेत तिची विचारपुस केली.त्यावेळी मुलीने घडलेली आपबिती वडिलांकडे साश्रू नयनांनी कथन केली. त्यावेळी हा सर्व धक्कादायक प्रकार उघडकीस आला. आरोपी हा पीडित मुलीच्या कुटुंबीयांचा शेजारी वास्तव्यास राहतो. त्यामुळे पीडित तरुणीचे आणि आरोपीचे एकमेकांच्या घरी येणे-जाणे होते. एक दिवशी पीडित अल्पवयीन मुलगी घरी एकटी असल्याचा गैरफायदा घेत आरोपीने पीडितेला आपल्या घरी सोनपापडी देण्याच्या आमिषाने बोलावले.आणि तिच्यावर बलात्कार केला. यावेळी आरोपीचे तीन मित्र उपस्थित होते.त्यांनी घटनेवेळी आरोपीच्या घराच्या दाराची कडी बाहेरून लावून घेतली.आणि दाराबाहेर पाळत ठेवली होती. अशी फिर्याद पीडित तरुणीच्या वडिलांनी महागाव पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.त्यावरून पोलिसांनी मुख्य सूत्रधार आणि बलात्काराला सहकार्य करणाऱ्या आरोपी विरोधात कलम ३७६,१०९, बाल लैंगिक आत्यचार प्रतिबंधक कायदा (पॉक्सो ) अंतर्गत कलम ४,६, व ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…