गुलाम नबी आझाद यांना दहशतवाद्यांचे धमकीचे पत्र….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
जम्मू काश्मीर :- काँग्रेसला काही दिवसांपूर्वीच सोडचिट्ठी दिलेले गुलाम नबी आझाद यांच्या विरोधात दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाची एक शाखा असलेल्या रेझिस्टन्स फ्रंटने सोशल मीडियावर एक धमकीचे पत्र जारी केले.
त्यात आझाद यांच्यावर काही आरोप करण्यात आले. त्या आरोपांना दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात आझादांनी उत्तर दिले, “माझे नाव आझाद आहे आणि माझे विचारही आझाद आहेत. द रेझिस्टन्स फ्रंटचे आरोप अयोग्य आहेत. काश्मीरमध्ये येण्यापूर्वी मी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल होते किंवा गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतलेली नाही.
“अल्लाची शपथ घेऊन सांगतो…”
गुलाम नबी आझाद यांचा जम्मू-काश्मीरमध्ये प्रवेश हा अचानक झालेला नसून, एका सुनियोजित योजनेचा हा भाग आहे आणि ही योजना आधीच बनवण्यात आली होती, असे या धमकीच्या पत्रात आरोपात केले आहेत. तसेच अमित शाह यांच्याशी आझाद यांनी जम्मू काश्मीरला परतण्याआधी भेट झाली आणि त्यांच्यात एक बैठक झाली. इतकेच नव्हे तर काही विश्वसनीय सूत्रांच्या म्हणण्यानुसार, असेही म्हटले गेले की या बैठकीत NSA डोवाल यांनाही बोलावण्यात आले होते. या आरोपांवर जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद म्हणाले, “मी नुकतेच ऐकले आहे की माझ्याविरोधात दहशतवाद्यांकडून धमकीचे पत्र आले आहे. काश्मीरमध्ये येण्यापूर्वी मी अमित शहा आणि डोवाल यांची भेट घेतली असं सांगितलं जातंय पण असं काहीच घडलेलं नाही. मी माझ्या उभ्या आयुष्यात डोवाल यांना कधीही भेटलेलो नाही, मी अल्लाहची शपथ घेतो.”
गुलाम नबी आझाद यांनी दहशतवाद्यांना शस्त्रे सोडून मुख्य प्रवाहात सामील होण्याचेही आवाहन केले. ते म्हणाले, “बंदुका हा कोणत्याही समस्येवरचा उपाय नाही. ज्यांनी बंदुका हाती घेतल्या आहेत, त्यांना मी आवाहन करतो की बंदुका केवळ विनाशच करतात, समस्यांवर तोडगा काढू शकत नाहीत. भारत ही सर्वात मोठी लोकशाही आहे. हे गांधींचे राष्ट्र आहे. त्यामुळे जे लोक चुकीचे वागतील ते चिरडले जातील आणि पण भारताला काहीही होणार नाही”, असेही ते म्हणाले.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…